एक्स्प्लोर

Latur Crime: खडी केंद्रातील मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले

Latur crime: लातूरमध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. हा व्यक्ती खडी केंद्रावर मुकदाम होता. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच कारणामुळे त्याची निर्घृण हत्या

लातूर: लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे एका व्यक्तीची डोक्यात कोयत्याचे वार करुन हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधांतून निर्माण झालेल्या वादातून हा खून (Latur Murder) झाल्याचे समजते. मारेकऱ्यांनी डोक्यात कत्ती आणि कोयत्याचे वार करुन संबंधित व्यक्तीची हत्या केली. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद प्रल्हाद इंगळे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  शरद इंगळे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच वादातून हा खून झाला. यानंतर शरद इंगळे याच्या कुटुंबीयांनी मुरुड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता. खून करणाऱ्या पाच लोकांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी इंगळे याच्या नातेवाईकांनी केली. त्यासाठी हे सर्वजण तीन तास पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी यापैकी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

शरद प्रल्हाद इंगळे हा खडी केंद्रात मुकादम म्हणून काम करत होता. करकट्टा येथील एका महिलेबरोबर त्याचे अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघेही पळून गेले होते. दोघांची समजूत काढून त्यांना वापस बोलवण्यात आले होते. दोघांची लग्नंही झालेली आहेत. महिलेचा पती मोठा मुलगा आणि एका अल्पवयीन मुलांनी मिळून शरद इंगळे याचा खून केल्याचे बोलल जात आहे. यापैकी दोन जण कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत पळून जात असताना काही लोकांनी पाहिले आहे. कोयता आणि कत्तीचा गंभीर वार करत शरदचा खून करण्यात आला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

बीडमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून

बीड जिल्ह्यातील बीडच्या धारूर तालुक्यातील कान्हापूर गावात पूर्व वैमानस्यातून युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील कान्हापूर गावात पूर्व वैमानस्यातून युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी स्वतः शिरसाळा पोलीस ठाण्यात हजर झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
मार्च 2023 साली स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातील किराणा दुकानदार अविनाश देशमुख याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी स्वप्निल उर्फ बबलू देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता  हाच गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याच्याकडून वारंवार अविनाश देशमुख याच्या कुटुंबीयांवर दबाव आणत होता

वाढत असलेला याच दबावाला कंटाळून अविनाश देशमुख याचा भाऊ संतोष देशमुख आणि भाऊजय सोनाली देशमुख यांनी रविवारी सायंकाळी अविनाश याने 2023 साली आत्महत्या केलेल्या झाडाखालीच स्वप्नील उर्फ बबलू देशमुख यांच्यावर संतोष देशमुख व त्याची पत्नी याने गुप्तीच्या साह्याने वार करत त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याचा चेहराही दगडाने ठेचला. या झटापटीत संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख देखील जखमी झाले आहेत.

या प्रकरणातील सात आरोपी पैकी संतोष देशमुख,सोनाली देशमुख आणि राजेभाऊ देशमुख या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित चार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरसाळा पोलीस करत आहेत.ताब्यात घेतलेल्या आरोपींना आता पुढील कारवाईसाठी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांत बीड जिल्ह्यामध्ये वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र दिसून लागले आहे.

आणखी वाचा

'पाच दिवसांपासून जेवलो नाही, पत्नीला माझा चेहरा दाखवू नका'; अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, व्हॉटसॲप स्टेटसवर म्हणाला....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar in Satara: 'मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जातं'; अजित पवारांचा सूचक इशारा
Mahayuti Rift: 'आघाडीत फायदा असेल तरच युती, अन्यथा स्वबळावर लढा', अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत
Drone Surveillance: 'कोणता सर्व्हे घरात डोकावण्याची परवानगी देतो?', आदित्य ठाकरेंचा MMRDA ला सवाल
Maha Polls 2025: भाजप-RSS ची मुंबईत गुप्त बैठक, 'महायुतीत जास्त जागा मिळवण्यावर भर', फडणवीसांची रणनीती
Maharashtra Politics: '...कुबड्या तोडून चुलीत घालायच्या आहेत', रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Embed widget