एक्स्प्लोर
Sharad Pawar NCP : बीड जिल्ह्यात राजकीय गुन्हेगारी वाढलेली असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
Sharad Pawar NCP : बीड जिल्ह्यात राजकीय गुन्हेगारी वाढलेली असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

Photo Credit - abp majha reporter
1/9

गेल्या सहा महिन्यांपासून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे.
2/9

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, सरपंच बापू आंधळे आणि महादेव मुंडे यांच्या हत्या झाल्यानंतर राज्याचं राजकारण तापलेलं पाहायला मिळालं.
3/9

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांची चौकशी झाल्याचंही समोर आलं होतं.
4/9

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आणि बीड जिल्ह्यात राजकीय गुन्हेगारी वाढलेली असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय घेतलाय.
5/9

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारणी बरखास्त करण्यात आलीये.
6/9

राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयात चार तास बैठक पार पडली.
7/9

या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के इत्यादी नेते उपस्थिती होते
8/9

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
9/9

महिनाभरात नवीन कार्यकारणी कार्यरत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी माहिती दिलीये.
Published at : 15 Feb 2025 11:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
