Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Dattatray Gade Arrested : स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेने तीन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

Dattatray Gade Arrested : पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम, ड्रोन, डॉग स्कॉड तयार करण्यात आले होते. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण असल्याचे आढळून आले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी याबाबत पुष्टी देखील केली आहे. आता स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने तब्बल तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडेच्या गळ्यावर व्रण आहेत. हे व्रण त्याने आत्महत्या केल्याचा प्रयत्न दर्शविणारे आहेत. जेव्हा बलात्काराचा प्रकार मंगळवारी घडला, त्यानंतर तो त्याच्या गावाकडे पळून गेला. तेव्हा त्याला समजलं की, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त व्हायला लागला आहे. तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात तो ज्या शेतात तो लपला होता तिथल्याच एका झाडाला त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती दोरी तुटली. त्यानंतर तो पळून जात असताना विष किंवा कीटकनाशक मिळवण्याचा तो प्रयत्न करत होता. परंतु ते देखील त्याला मिळाले नाही. यानंतर त्याने पुन्हा एकदा गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळेस देखील त्याला यश आले नाही, अशी माहिती आता समोर येत आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडेला ताब्यात घेतले आहे. आज त्याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवण्यात येणार आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
दरम्यान, पोलिसांनी दत्तात्रय गाडेला कसे ताब्यात घेतले याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. या व्रणानुसार आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तशी कबुली दिली. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोरी तुटल्यामुळे व वेळीच इतर लोक धावून मदतीस आल्यामुळे आपला जीव वाचला असे त्याने सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा


















