एक्स्प्लोर
Chandra Grahan 2025 : मार्च महिन्यात 'या' दिवशी लागणार वर्षातलं पहिलं चंद्र ग्रहण; भारतात दिसणार की नाही? वाचा ज्योतिषशास्त्र
Chandra Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षातलं पहिलं ग्रहण मार्च महिन्यात होळीच्या दिवशी लागणार आहे. पण, हे ग्रहण भारतात दिसेल की नाही? भारतात सूतक काळ असेल? याच संदर्भात जाणून घेऊयात.
Chandra Grahan 2025
1/7

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक वर्षी सूर्य आणि चंद्रग्रहण लागते. धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास ग्रहण दिसणं अशुभतेचं लक्षण आहे. याच कारणामुळे हिंदू धर्मात ग्रहणाच्या काळात सूतकाच्या नियमांचं पालन केलं जातं.
2/7

वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण मार्च 2025 रोजी लागणार आहे. 14 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीला वर्षातलं पहिलं चंद्र ग्रहण लागणार आहे.
3/7

14 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी ग्रहणाची सुरुवात होणार असून दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी ग्रहण संपणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण दिवसा दिसणार आहे. मात्र, भारतात हे ग्रहण दिसणार नाही.
4/7

माहितीसाठी, ज्या देशात ग्रहण दिसतं त्या ठिकाणी सूतक काळ लागू होतो.मात्र, भारतात हे ग्रहण दिसत नसल्या कारणाने भारतात चंद्रग्रहणाचा सूतक काळ लागू होणार नाही.
5/7

सूतक काळ नसल्या कारणाने होळीच्या दिवशी चंद्र ग्रहणाता प्रभाव नसेल. त्यामुळे 14 मार्च रोजी तुम्ही होळी खेळू शकतात. पूजा पठण करु शकता.
6/7

मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहण शब्दाचा अर्थ नकारात्मक होतो. त्यामुळे या काळात धार्मिक कार्यात चंद्र ग्रहणाचा प्रभाव पडत नसला तरी मात्र सर्व राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Feb 2025 09:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























