Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
मुंबईच्या रस्ते कामांबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या आयोजित बैठकीला सुरुवात झाली असून मुंबईतील लोकप्रतिनधी व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

मुंबई : विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून काही दिवसांपूर्वी विधिमंडळात शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते. त्यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. मात्र, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलेही नव्हते. त्यानंतर, आता पहिल्यांदाच आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि एकनाथ शिंदे विधानसभा सभागृहात एका बैठकीसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. या बैठकीत एकनाथ शिंदेंची एंट्री होतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) बैठकीसाठी एंट्री होताच सभागृहातील सर्वजण उठून आदर दर्शवतात. मात्र, आदित्य ठाकरे उठून उभे राहत नाहीत. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
मुंबईच्या रस्ते कामांबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या आयोजित बैठकीला सुरुवात झाली असून मुंबईतील लोकप्रतिनधी व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अद्याप बैठकीस उपस्थित राहिले नव्हते. अखेर, विधानसभेतील उपमुख्यमंत्री कार्यालयातील आपलं कामकाज झाल्यानंतर ते बैठकीला उपस्थित राहिले. मात्र, तत्पूर्वीच शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. अध्यक्षांनी बैठकीला सुरुवातही केली होती. दरम्यान, एकनाथ शिंदेंची उशीरा या बैठकीला एंट्री झाली. त्यामुळे, पक्षफुटीनंतर प्रथमच ठाकरे आणि शिंदे एका बैठकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले.
एकनाथ शिंदेंची या बैठकीसाठी एंट्री होताच सभागृहातील अनेक नेतेमंडळी उठून उभी राहिली. मात्र, आदित्य ठाकरे आपल्या खुर्चीवरच बसून राहिले. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाहून आपलं तोंड फिरवल्याचंही व्हिडिओत दिसून येत आहे. मुंबई रस्ते बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. त्यानंतर, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.
बैठकीला मुंबईतील नेतेमंडळी व आमदार
दरम्यान, या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, आमिन पटेल, महेश सावंत, सना मलिक, ज्योती गायकवाड, मनिषा चौधरी, मिहीर कोटेचा, प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल, बाळा नर, हारुण खान, अतुल भातखळकर आणि योगेश सागर यांच्यासह मुंबईतील लोकप्रतिनिधी व महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची उपस्थिती आहे.
हेही वाचा
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
