Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेबाहेर ही घटना घडली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाणे : उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला आहे.
वैभव देवधर आणि प्राची हे पती-पत्नी असून कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात. त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी कुटुंबीयांनी उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या शाखेत एकमेकांना बोलावलं होतं. मात्र यावेळी पती-पत्नीत वाद होऊन शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली.
यावेळी प्राचीच्या भावाने वैभव देवधरवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात वैभव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
सासरच्या मंडळींमध्ये आणि जावयामध्ये झालेल्या या हाणामारीचे सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला पती-पत्नीचा वाद सुरू असताना पतीने पत्नीवर हात उचलल्याचं दिसून येतंय. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील एक महिलाही त्यामध्ये दिसतेय. त्यानंतर सासरच्या मंडळींनी जावयाला चांगलंच धुतल्याचं दिसतंय.
या प्रकरणी आता विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढचा तपास करत आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
