Nagpur Violence : सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Maharashtra Live blog Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात नेमकं काय सुरु आहे, जाणून घ्या एका क्लिकवर.

Background
Maharashtra Live blog Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केले होते. यावरुन वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराचा शो झालेल्या ठिकाणी शिवसैनिकांची तोडफोड. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून कुणाल कामराचे समर्थन नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालणार असल्याची शक्यता
सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्या प्रकरणात खोक्या चकलांबा पोलिसांच्या ताब्यात होता
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज त्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते
यादरम्यान शिरूर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि एकमेकांवर हल्ला चढवला!
उल्हासनगर : येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सासरच्यांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला आहे. वैभव देवधर आणि प्राची हे पती-पत्नी असून कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात. त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी कुटुंबीयांनी उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या शाखेत एकमेकांना बोलावलं होतं. मात्र यावेळी पती-पत्नीत वाद होऊन शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली. यावेळी प्राचीच्या भावाने बहिणीच्या पतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले, या घटनेत प्राचीचा पती वैभव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.























