उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल
Ashish Shelar on Uddhav Thackeray : गद्दारीचे जनक हे उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) असल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं आहे.

Ashish Shelar on Uddhav Thackeray : गद्दारीचे जनक हे उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) असल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं आहे. ते लढले आमच्यासोबत आणि गेले दुसऱ्यासोबत, ही गद्दारी नाही का? असा सवाल शेलार यांनी केला. सत्तेत बसण्यासाठी वडलांचे विचार सोडले ही गद्दारी नाही का
छावाबद्दल दोन शब्दही न काढणारे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ढोंगी
आजकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा आणि उद्धवजींचा ढोंगीपणा उघड होत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. छावा चित्रपटाने पराक्रमाचे दर्शन घडवले आहे.
मात्र छावाबद्दल दोन शब्द न काढणारे दोन ढोंगी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. त्यांचा पक्ष हा ढोंगी आहे. संपूर्ण देशाने आनंदोत्सव केला आहे. मात्र, दोन महाभागाने हा साजरा केला नसल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी गोळ्या घातल्या त्या काँग्रेसबरोबर तुम्ही हातमिळवणी केली
कुंभमेळा जगातला सर्वात मोठा श्रद्धा निष्ठेचा मेळा झाला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाकुंभात सहभागी देखील झाले नाहीत. त्यामुळं ते ढोंगी आहेत. वर्तमानपत्रात बातमी वाचली, उबाठा सेनेनं सांगितलं आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी नसणाऱ्यांच्या हातात राज्य आहे. यावर बोलताना शेलार म्हणाले की, तुम्ही वाक्य सुधारा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी गोळ्या घातल्या त्या काँग्रेसबरोबर हातमिळवणी तुमची आहे. हुतात्मा झालेल्या विरांवर हल्ला करत हाताला रक्त लागलं, त्या हाताशी तुमची हातमिळवणी आहे. काँग्रेससोबत हातमळवणी केली हेच आमचं म्हणणं आहे असेही शेलार म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते ऐकमेकांवर जहरी टीका करत आहे. ठाकरेंकडून शिवसेना शिंदे गटावर गद्दारी केल्याची टीका होत आहे. मात्र, भाजपकडून उद्धव ठाकरे हेच गद्दार असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत लढले आमच्यासोबत आणि गेले दुसऱ्यासोबत, त्यामुळं उद्धव ठाकरे हेच गद्दार आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
Ashish Shelar : ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; 'छावा'वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
