एक्स्प्लोर
Dattatray Gade Arrested : मंगळवारी पहाटे गुन्हा घडला, बुधवारी उघडकीस आला, गुरुवारी ड्रोन अन् डॉगस्कॉडने दिवसभर तपास, शुक्रवारी अटक, 70 तासांमध्ये काय काय घडलं?
Dattatray Gade Arrested : मंगळवारी पहाटे गुन्हा करून आरोपी गाडे फरार झाली, त्यानंतर बुधवारी हा गुन्हा उघडकीस आला, गुरुवारी दिवसभर तपास केला तर शुक्रवारी स्थानिकांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

Dattatray Gade Arrested
1/8

स्वारगेट बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे 26 वर्षीय तरुणी आल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तिला तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये बसण्यास सांगून नंतर तिच्यावर बलात्कार केला.
2/8

सकाळी साडेसहाच्या सुमारास घटना घडल्यानंतर आरोपी एसटीने शिक्रापूर येथील घरी गेला. गुन्ह्याची भीती आणि पोलिसांकडून पकडले जाण्याच्या संशयातून त्याने घरातून पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
3/8

बुधवारी संपूर्ण घटना उघडकीस आली, तेव्हापासून पोलिसांनी त्याची ओळख पटवून शोध सुरू केला, गुरुवारी दिवसभर तपास करण्यात आला, त्याच्या घरातील व्यक्तींची, मित्रमंडळींची चौकशी करण्यात आली.
4/8

घरातून पळून गेल्यानंतर गावातव त्याने एका वृद्ध महिलेला पाणी मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो शिक्रापूर परिसरात शेतात लपून बसल्याचा संशय आहे.
5/8

या घृणास्पद प्रकारानंतर त्याने आयुष्याचे काही बरे-वाईट करण्याचा विचारही केला असल्याची शक्यता वर्तवली गेल्याने पोलिसांनी शिक्रापूर परिसरातील सर्व विहिरी धुंडाळून काढल्या.
6/8

पोलीस ड्रोनच्या साह्याने, डॉग स्कॉडच्या मदतीने सर्वत्र त्याचा शोध घेतला. शुक्रवारी अखेर स्थानिकांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली आहे.
7/8

गाडे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांत यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. आरोपी नराधम दत्तात्रय गाडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे.
8/8

गाडे पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी 13 पथके तयार केली. गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची, मैत्रिणींची पोलिसांनी बुधवारी रात्री चौकशी केली.
Published at : 28 Feb 2025 10:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion