एक्स्प्लोर
मंगळवारी तरुणीला ओरबाडलं, बुधवारी आरामात गावी जाऊन कीर्तन ऐकलं; नंतर पोलिसांना फिरव फिरव फिरवलं... नराधम दत्ता गाडेची 70 तासांची कहाणी एक क्लिकवर
Pune Swargate Bus Stand Crime : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे.
Dattatray Gade Arrested after 70 of incident Swargate bus Stand case
1/12

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे.
2/12

स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले.
3/12

फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता.
4/12

गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती.
5/12

तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त, स्थानिक नागरिकांची मदत गाडेला पकडण्यासाठी घेण्यात आली.
6/12

रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आल्यानंतर, मला पश्चाताप होतोय. मला सरेंडर व्हायचं आहे, असे बोलला.
7/12

गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले.
8/12

तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला. त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी हजेरी लावली, तर दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले.
9/12

त्यावेळी पोलिस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले. त्याचा मोबाइल बंद झाल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत आहेत.
10/12

आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली होती. त्याच्या गुनाट (ता. शिरूर) या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला.
11/12

गावाच्या परिसरात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता होती. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास पोलीसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबविला.
12/12

मात्र, गावात ये-जा करण्यासाठी 3 असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू होती, सुमारे 250 पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात होता.
Published at : 28 Feb 2025 09:42 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















