एक्स्प्लोर
Ramadan 2023 : रमजान काळात एकदा तरी मालेगावात या! बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली...
Eid-Ul-Fitr 2023 : रमजान महिन्याच्या उत्तरार्धात खरेदीसाठी नाशिकच्या मालेगावात मुस्लीम महिलांची शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे.

Eid-Ul-Fitr 2023
1/12

रमजान महिन्याच्या (Ramadan 2023) उत्तरार्धात खरेदीसाठी नाशिकच्या (Nashik) मालेगावात (Malegaon) मुस्लीम महिलांची शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे.
2/12

रात्रभर खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत असल्याने शहरातील किदवाई रोड, गूळबाजार, मुशावर्त चौक, अंजुमन चौक आदी ठिकाणी 'रात्रीचा दिवस' झालेला पाहायला मिळतो.
3/12

येत्या शुक्रवारी (21 एप्रिल) रात्री चंद्रदर्शन झाल्यास शनिवारी (22 एप्रिल) रमजान ईद (Eid-Ul-Fitr 2023) असणार आहे. त्यामुळे रमजान ईदच्या खरेदीसाठी महिलावर्ग गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
4/12

महिला विशेष करुन चपला, कपडे, बांगड्या, ज्वेलरी, नान पाव, कटोरे, शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करत आहेत
5/12

तर पुरुष वर्ग टोप्या, लुंगी, सुवासिक अत्तर, तयार कपडे आदींना पसंती देत आहे.
6/12

खरेदीसाठी मोजकेच दिवस राहिल्याने संध्याकाळ होताच दिवसभर रोजा असलेल्या रोजाधारकांकडून इफ्तारीसाठी फळे आणि खजूर यांची खरेदी केली जाते.
7/12

त्यानंतर संपूर्ण रात्र महिलांसह आबालवृद्धांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
8/12

उपवास सोडण्यासाठी लागणारे खजूर आणि फळांची मोठ्या प्रमाणात शहरात आवक झाली असून त्याची सर्वाधिक विक्री मालेगावात होत आहे.
9/12

काही जण चांदरातच्या दिवशी खरेदीसाठी गर्दी करतात.
10/12

मालेगाव स्थानिकांखेरीज ग्रामीण भागातून विशेषतः नांदगाव, देवळा, सटाणा, नामपूर, मनमाड, झोडगे आदी भागातून मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने खरेदीसाठी मालेगावी येत आहेत.
11/12

शहरात रमजान ईदमुळे रौनक आली असून रात्री विद्युत रोषणाईने सर्वच रस्ते न्हाऊन निघाले आहे. दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे
12/12

रमजान ईद म्हटले की मालेगावात खरेदीसाठी झुंबड उडते. केवळ मालेगावकर नाहीच तर परिसरातील नांदगाव, मनमाड, सटाणा, आदी तालुक्यातील मुस्लीम बांधवही येथे खरेदीसाठी गर्दी करतात. योग्य भाव व उत्तम दर्जा असलेल्या वस्तू खरेदी करायला रमजान काळात एकदा तरी मालेगावात यायलाच हवं.
Published at : 18 Apr 2023 04:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
व्यापार-उद्योग
जालना
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
