ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025
आमदार सुरेश धस आज मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार,धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदा मस्साजोगला जाणार, महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांनाही भेटणार.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान, धार्मिक मुद्द्यावर मतं मागितल्याचा आरोप...पवार गटाच्या मेहबुब शेख यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटिसा.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, मनोज जरांगेची मागणी, मस्साजोगला जाऊन गावकऱ्यांशी केली चर्चा...२५ फेब्रुवारीच्या अन्नत्याग आंदोलनावर गावकरी ठाम...
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला.. मराठी भाषा दिनी प्रत्येक जिल्ह्यात उभारणार पुस्तकांचे गाव...राज्य सरकारचं अभियानं..
कृषिमंत्री कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माझाला माहिती
शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्यावर किशोर तिवारींची ठाकरे, राऊतांवर तोफ, राऊतांमुळेच पक्षाचं नुकसान झाल्याचा आरोप





















