एक्स्प्लोर
Photo: नांदेडच्या आदिवासी पाड्यावरील नागूबाई जेव्हा तिरंगा फडकवितात
Nanded: आदिवासी बांधवांनी घरोघरी तिरंगा उत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

Nanded News
1/6

Nanded News: तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर सुद्धा "घरोघरी तिरंगा" उपक्रम राबवण्यात आलाय.
2/6

चारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले होते.
3/6

अवघ्या 15 उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
4/6

यावेळी गावातील जेष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम ही महिला गावातील इतर महिला समवेत आपल्या दाराला तिरंगा लावण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले होते.
5/6

सडे आणि रांगोळीने सजलेल्या खांबाला त्यांनी तिरंगा लावल्याने देश प्रेमाची एक नवी ऊर्जा त्यांच्यात पाहायला मिळत होती.
6/6

गावातून, विविध पाडयामधून विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून अवघा परिसर देशभक्तीमय केला होता.
Published at : 16 Aug 2022 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
अहमदनगर
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
