एक्स्प्लोर

सलग सुट्ट्यांमुळं पंढरीत भाविकांची मोठी गर्दी, विठुरायाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तिरापर्यंत, 

सध्या सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळं लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागातिरावरील सारडा भवनपर्यंत पोहोचलीय.

सोलापूर : सध्या सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळं लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. पंढरपूर ओवरपॅक झालं आहे.  विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागातिरावरील सारडा भवनपर्यंत पोहोचली आहे. दर्शनरांग लांब असल्यानं खाली मॅट नसल्याने भाविकांचे पाय उन्हामुळं भाजत आहेत. डोक्यावर असणारा सूर्य देव आग ओखत आहे.

एका बाजुला उन्हाचा कडा असून दुसऱ्या बाजुला दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी देखील पुरवले जात नसल्याने याबाबत भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देवाच्या दर्शनाला जायचे आहे त्यामुळे पाय भाजणे किंवा घसा कोरडा पडला तरी तक्रार कोणाकडे करावी शेवटी देवाचे दर्शन महत्त्वाचे आहे. त्यामुळं हा त्रास सोसावाच लागेल अशा प्रतिक्रिया संतप्त भाविकांकडून दिल्या जात आहेत. शनिवार त्यानंतर आलेला गुढीपाडवा आणि आजची रमजान ईद अशा मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळं देशभरातील हजारो भाविक, पर्यटक सध्या विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आलेले आहेत. मात्र दर्शन रांगेतील भाविकांना या कडाक्याच्या उन्हात पाय भाजू नयेत यासाठी जी खबरदारी घ्यायला हवी ती मंदिर समितीकडून घेतली गेलेली नाही. दर्शन रांगेत काही ठिकाणी जुने मॅच चे तुकडे टाकले असून ठीक ठिकाणी पाय भाजत भाविकांना रांगेतून पुढे सरकावे लागत आहे. यातच पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय रांगेत नसल्याने भाविक हैराण झाली आहेत. दर्शन रांगेत लहान मुले वृद्ध असे अनेक भाविक असल्याने यांना पाय भाजतच देवाकडे जावे लागत आहे. 
    
दरम्यान, याबाबत वारंवार एबीपी माझा ने हे वास्तव समोर आणूनही मंदिर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. वास्तविक दर्शन रांगेसाठीचा ठेका मंदिर समितीने दिलेला असला तरी हा ठेकेदार काय करतोय याबाबत प्रशासन डोळे मिटून शांत आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन दर्शन रांगेत मॅट टाकून पिण्याच्या पाण्याची सोय केल्यास भाविक देवाचे सुलभ दर्शन घेऊ शकतील. 

देशातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत हे पंढरपुरचे श्री विठ्ठल रुक्मिणी आहे. त्यामुलं दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पंढरपुरमध्ये पाहायला मिळाली. 

महत्वाच्या बातम्या:

विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget