एक्स्प्लोर
संबळाचा कडकडाट, गुढीपाडव्यापासून माहुरगडावर चैत्र नवरात्राला सुरुवात, लाखो भाविकांसाठी मंदीर प्रशासन सज्ज
गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, माहुरगडावर चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून माहूरगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Mahur
1/8

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरच्या रेणुका गडावर चैत्र नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
2/8

गुढीपाडव्यापासून या चैत्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्त रेणुका मातेची महापूजा करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयेजन करण्यात येणार आहे.
3/8

भाविकांची दर्शनाला येणारी संख्या व उन्हाळ्याचे दिवस पाहता मंदिर प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे.
4/8

चैत्र नवरात्र महोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक माहूरच्या रेणूका मातेच्या दर्शनाला येतात.
5/8

उद्या गुढीपाडव्यानिमित्त रेणूका मातेची महापूजा, कुमारीका पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली.
6/8

रेणूका मातेच्या पूजेदरम्यान छबिना पूजा करण्यात येते. त्यासाठी हा छबिना सजवण्यात आला आहे.
7/8

रेणूका मातेला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पुरणपोळीचा नैवेद्य व महाआरती करण्यात येणार आहे.
8/8

दरम्यान, चैत्र नवरात्रापूर्वी देवीची आज पूजा करण्यात आली. यावेळी संबळाच्या निनादाने रेणूका मातेचा जागर करण्यात आला.
Published at : 29 Mar 2025 03:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























