औरंगजेबाच्या खाणाखुणा आमच्या शहरात नको, तो इतिहास आम्हाला पुसायचाय, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट
औरंगजेबाच्या ( Aurangzeb) आठवणी आम्हाला नको आहेत. त्या त्रासदायक आहेत. त्याच्या खाणाखुणा आमच्या शहरात नको अशी भूमिका मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मांडली.

Sanjay Shirsat : औरंगजेबाच्या ( Aurangzeb) बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे की, आम्हाला त्याच्या आठवणी नको आहेत. त्या त्रासदायक आहेत. त्यामुळं त्याच्या खाणाखुणा आमच्या शहरात नको अशी भूमिका मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मांडली. औरंगजेबाची कबर नसावी याचे कारण म्हणते त्यानं छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले. म्हणून आम्हाला तो इतिहास पुसायचा आहे, त्यात राजकार नाही असे संजय शिरसाट म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या गुढी पाडव्याच्या मेळा्व्यात औरंगजेबाच्या कबरीबाबत वक्तव्य केलं होतं. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. औरंगजेबाच्या बाबतीत अनेक लोक तर्क लावत आहेत. औरंगजेब नगरला मेला, त्याची इच्छा होती इथं पुरावे म्हणून त्याला इथं आणले. त्याला कुणी गाडलं वगैरे नाही, तो चुकीचा इतिहास आहे असे शिरसाट म्हणाले. हे राज्य मराठी भाषिकांचे आहे, आमची हीच भूमिका आहे असे शिरसाट म्हणाले.
कुणी काहीही बोला लाडकी बहिज योजना बंद होणार नाही
लाडकी बहिण योजनेबाबत देखील संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. कुणी काहीही बोला लाडकी बहिज योजना बंद होणार नाही. प्रश्न 2100 चा तर आर्थिक घडी विस्कटलेली आहे थोडा कालावधी लागेल असे संजय शिरसाट म्हणाले. शेतकऱ्यांना काही सुविधा द्यायचा आहेत अर्थमंत्री ते करताय त्याला कालावधी लागेल. 1 रुपया योजना बंद केली तर त्याला पर्याय होईल असे शिरसाट म्हणाले. महसूल उत्पन्न वाढण्यासाठी काम सुरुय लाडकी बहीण बंद होणार नाही. दरम्यान, अफजलखानाची कबर उखडली ना आणि संघ जरी महणत असेल विषय अनावश्यक आहे तर ती त्यांची भूमिका आमची वेगळी भूमिका आहे असे संजय शिरसाट म्हणाले.
रामायण महाभारत सिरीयल मधून कळले
काही गोष्टी या वाचण्यात ऐकण्यात येत नाहीत. काहींना त्या चित्रपटात दिसतात. बाळासाहेब पण चित्रपटातून लोकांना कळले. रामायण महाभारत सिरीयल मधून कळले. त्याच्यामुळे हिंदुत्व जागे झाले असे काही नाही. नरेंद्र मोदी 3 वेळ पंतप्रधान राहिले आहेत. पुढं कोण असावं यावर आता विचार करण्याची बोलण्याची गरज नाही. कुणीही वारसदार झाले तर त्याने भारताची भूमिका सांभाळावी असे शिरसाट म्हणाले. विजय वडेट्टीवार कुठल्या पक्षात आहे हे कळत नाही. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. कुणाल कामराला मुंबईत येऊ द्या, बडबडू द्या, त्याला शिक्षा कशी देणार हे न्यायालय ठरवेल, त्याला शिक्षा प्रसाद मिळेल असे शिरसाट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
औरंगजेबाच्या कबरीजवळ मोठा बोर्ड लावा, मराठ्यांनी कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे पाच मुद्दे
























