एक्स्प्लोर
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Cryptocurrency Gain bitcoin: गेन बिटकॉईन हे सॉफ्टवेअर मे. व्हेरिएबल टेक प्रा. लि. या कंपनीकडे होते. या बिटकॉईनच्या सॉफ्टवेअरचे प्रमोशन करण्यासाठी दुबईत एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.

Gain bitcoin Cryptocurrency scam
1/7

तब्बल 6600 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणात मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरु या शहरांमध्ये तब्बल 60 ठिकाणी धाड टाकली.
2/7

सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात गेन बिटकॉईन कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती 6600 कोटी रुपये इतकी आहे. मे. व्हेरिएबल टेक प्रा. लि. या कंपनीची स्थापना अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, महेंद्र भारद्वाज यांनी 2015 मध्ये केली होती.
3/7

या कंपनीच्या गेन बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी 10 टक्के परताव्याचे प्रलोभन दाखवणारी योजना सुरु करण्यात आली होती. 2017 मध्ये याप्रकरणात नांदेडमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांदेडमधील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी 2017 मध्ये गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली होती.
4/7

सुरुवातीला या कंपनीने गुंतवणुकदारांना महिन्याला 10 टक्के व्याजाने परतावा दिला. त्यामुळे अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवले होते. एकट्या नांदेड जिल्ह्यात गेन बिटकॉईनच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
5/7

गेन बिटकॉईनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज याने नांदेडमध्ये शिक्षण घेतले होते. त्याने अनेकांना महिन्याला 10 टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून गेन बिटकॉईन हे सॉफ्टवेअर अनेकांना दिले होते. नांदेडमधील एका डॉक्टरने अमित भारद्वाज याला 50 लाख रुपयांचे बिटकॉईन्स दिले होते.
6/7

सुरुवातीच्या काही महिन्यांत गेन बिटकॉईनच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाला. मात्र, नंतरच्या काळात अमित भारद्वाज याने गुंतवणुकदारांची फसवणूक केली आणि तो दुबईला पळून गेला. त्याच्याविरोधात देशविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊन त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी त्याचा मृत्यू झाला होता.
7/7

गेन बिटकॉईन हे सॉफ्टवेअर मे. व्हेरिएबल टेक प्रा. लि. या कंपनीकडे होते. या बिटकॉईनच्या सॉफ्टवेअरचे प्रमोशन करण्यासाठी दुबईत एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. गुंतवणुकदारांना विविध एक्स्चेंजवरुन बिटकॉईन खरेदी करायला सांगून ते गेन बिटकॉईनमध्ये गुंतवण्यास सांगितले जाई. यासाठी क्लाउड माईनिंग कॉन्ट्रॅक्टचा वापर केला जात असे.
Published at : 26 Feb 2025 07:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
