एक्स्प्लोर

विखे पाटलांच्या साखर कारखान्यास 296 कोटींची मदत; निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय

Ahilyanagar News : कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.  

Ahilyanagar News : प्रवरा नगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या (Padma Shri Vitthalrao Vikhe Patil Sugar Factory) निवडणुका लवकरच होणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.  

राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) मार्फत 296 कोटी रुपयांचे खेळते भांडवल या कारखान्यास मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. 

आर्थिक मदत कोणाच्या फायद्याची ठरणार?

कारण जिल्ह्यातील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांच्या गटांत साखर कारखान्यांच्या निवडणुकांवरून मोठी चुरस असते. विशेषतः संगमनेरमधील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरा नगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय समीकरणे आणि सहकार क्षेत्रातील हालचाली पाहता ही आर्थिक मदत नेमकी कोणाच्या बाजूने फायद्याची ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

प्रांताधिकारी हिंगे, आहेर यांच्यावर थोरात, विखे कारखान्याची जबाबदारी

दरम्यान, नगरसह राज्यात नावलौकिक असणार्‍या संगमनेरच्या थोरात कारखाना आणि प्रवरानगरच्या विखे पाटील कारखान्यासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आता निवडणूक निर्णय अधिकारी यांचीही नियुक्ती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आली आहे. यात संगमनेर साखर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश शालिग्राम हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेरचे तहसीलदार धीरज बाळासाहेब मांजरे काम पाहणार आहेत. तर डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर काम पाहणारा असून त्यांना राहाता येथील तहसीलदार अमोल रमाकांत मोरे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मदत करणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...

भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढच्या आठवड्यात, जे. पी नड्डांनंतर या 4 नावांची चर्चा, संघाच्या सहमतीनं होणार निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
BMC standing Committee: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
BMC standing Committee: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Pune ZP Election Result : पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
Embed widget