Hasin Jahan Targets Mohammed Shami: 'मोहम्मद शमी का बाप बना हुआ है नरेंद्र मोदी...'; मोहम्मद शमीच्या बहिणीवरही गंभीर आरोप, हसीना जहाँचा हल्लाबोल
Hasin Jahan Mohammad Shami: मोहम्मद शामीची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँनं पुन्हा एकदा आपल्या घटस्फोटीत नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांवर आगपाखड केली आहे.

Hasin Jahan Mohammad Shami: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज म्हणजे, मोहम्मद शामी (Mohammed Shami). कोणत्याही संघाचा, कितीही अनुभवी, धुरंधर फलंदाज असून देत, टीम इंडियाच्या मोहम्मद शामीची ओव्हर आली की, त्याच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून मोहम्मद शामी जेवढा आपल्या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी चर्चेत आहे. तेवढाच तो त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. मोहम्मद शामीचा त्याची पत्नी हसीन जहाँसोबतचा (Haseen Jahan) घटस्फोट क्रिडाविश्वात चर्चेचा विषय ठरला. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ मोहम्मद शामीवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच आता पुन्हा एकदा हसीन जहाँनं (Mohammes Shami Sister Fraud) मोहम्मद शामीच्या कुटुंबावर आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एरव्ही शामी कुटुंबीयांवर आरोप करणाऱ्या हसीन जहाँनं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केलीय.
हसीन जहाँकडून मोहम्मद शामीवर आगपाखड
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शामीची बहीण शबीना, मेहुणा मोहम्मद गजनबीसोबत कुटुंबातील आठ सदस्स्यांची नावं मनरेगा वेतन घोटाळ्याशी जोडली गेली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशातच आता हसीन जहाँनं याप्रकरणावर राग व्यक्त केला आहे. हसीना जहाँनं शामी कुटुंबीयांशी निगडीत वेतन घोटाळ्यासंदर्भातल्या एका बातमीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
"मोहम्मद शामीचा बाप बनलाय मोदी..."
मीडिया रिपोर्ट्सनुसार, "भारत हा एक भ्रष्ट देश आहे. आपल्या महान भारतात गरिबांना अधिक गरीब केलं जातं आणि त्यांचा छळ केला जातो. श्रीमंत महिलांना सुविधा दिल्या जातात आणि त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये पाठिंबा दिला जातो. काहीही असो, नरेंद्र मोदी आणि योगी हे शामी अहमदचे बाप बनलेत, सर्व बदमाशांना सरकारच्या ताकदीनं वाचवलं जाईल. काहीही असो, अमरोहाचे पोलीस कवडीमोल आहेत. तक्रारदाराला धमकी देऊन प्रकरण मिटवलं जाईल. काहीही असो, शामी अहमदचा कौटुंबिक व्यवसाय बेकायदेशीर काम करणं, चुकीची कामं करणं. कालपासून मला अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतरांकडून फोन आणि मेसेज आले आहेत, माझं उत्तर असं होतं की, तुम्हा सर्वांना माहीत आहे की, काय बरोबर आणि काय चूक, पण तुमच्या लोकांमध्ये जगाला सत्य सांगण्याची आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याची हिंमत नाही, म्हणून जा आणि त्यांचे पाय चाटून टीआरपी मिळवा."
काय आहे प्रकरण?
क्रिकेटपटू मोहम्मद शमीची बहीण शबिना हिचं लग्न जोया ब्लॉकमधील पलौला गावातील रहिवासी मोहम्मद गजनबीशी झालंय. शबिनाची सासू गुले आयेशा ही गावाची प्रमुख आहे. शबिना आणि तिचा नवरा गजनबी यांनी गावात मनरेगा कामगार म्हणून स्वतःची नोंदणी केली होती. एवढंच नाही तर शबिनाचा पती गजनबी आणि त्याचे दोन मेहुणे, जे एमबीबीएस आणि एलएलबीचे शिक्षण घेत आहेत, त्यांचंही मनरेगा कामगार म्हणून जॉब कार्ड आहे. या चौघांच्या खात्यात सुमारे 2.66 लाख रुपये मनरेगा वेतन पाठवण्यात आलं आहे.
चार वर्षांत, शबीनाने 71,013 रुपये, तिचा पती गझनवीने 65,000 रुपये, तिचा मेहुणा अमीर सुहेल, जो लखनौमध्ये एमबीबीएस करत आहे, त्यानं 63,851 रुपये आणि तिचा मेहुणा शेखू, जो एलएलबी करत आहे, त्यानं 67,000 रुपये कमावले. या चौघांचे मनरेगा जॉब कार्ड 2021 मध्ये बनवण्यात आलं होतं, जे ऑगस्ट 2024 पर्यंत सक्रिय होते. सरकारी निधीच्या थेट गैरवापराचे प्रकरण प्रसिद्ध झाल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प संचालक अमरेंद्र प्रताप सिंह यांच्याकडे तपास सोपवला. यानंतर, अधिकारी तीन वर्षांच्या नोंदी तपासण्यात व्यस्त आहेत.
























