Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी
Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात आपल्याच घरातील सुनेचा छळ आणि तिला अमानुष मारहाण करून तिच्या डोक्यावर चक्क पिस्तूल ठेऊन दागिने आणि पैशासाठी मागणी केली आहे.

Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात आपल्याच घरातील सुनेचा छळ आणि तिला अमानुष मारहाण करून तिच्या डोक्यावर चक्क पिस्तूल ठेऊन दागिने आणि पैशासाठी मागणी केली आहे. पेणमधील एका पाटील कुटुंबाचा हा प्रताप सुनेनेच समोर आणला आहे. या घटनेनंतर पाटील कुटुंबाविरोधात संतापलेल्या प्रज्ञा पाटील या तक्रारदार महिलेने पोलीस स्टेशन गाठलय. घरच्या मंडळींचा असलेला व्याजाचा व्यवसाय आणि या व्यवसायाकरिता मला माझ्या वडिलांकडून 50 लाख रुपये घेऊन येण्यासाठी जबरदस्ती करत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार या महिलेने सांगितला आहे. यानंतर पेन पोलिसांनी देखील याबाबत पुरावे सापडल्यास छळ करणाऱ्या पाटील कुटुंबावर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.
बांगलादेशी घुसखोरांची मुंबईतील वाढती संख्या, पोलीस कारवाईत वाढ
मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्याने सामाजिक आणि आर्थिक घटकांवर ताण निर्माण होत आहे. बांगलादेशातून मुंबईत रोजगार आणि इतर कारणांमुळे येणारे नागरिक सध्या पोलीस कारवाईचे लक्ष्य बनले आहेत. गेल्या तीन वर्षांत १,१७३ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली असून, २५९ नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यात आले आहेत.
घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये बांगलादेशी नागरिकांची सहभागिता ही मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. यामध्ये अनेक आरोपी चोरी, दरोडे, अंमली पदार्थांची तस्करी आणि अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे, बांगलादेशातून येणारे घुसखोर बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून भारतात बेकायदेशीरपणे राहतात. या घुसखोरांना मदत करणारे भारतीय नागरिकदेखील पोलिसांच्या सापळ्यात येत आहेत.
2025 मध्ये, 2024 च्या तुलनेत सर्वाधिक घुसखोरांची अटक
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात हे घुसखोर राहत असल्याने त्यांच्या ओळखीची प्रक्रिया ही आव्हानात्मक ठरते. तरीही, मुंबई पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांच्या सततच्या प्रयत्नांमुळे घुसखोरांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये पोलीस, गुन्हे शाखा, ए.टी.एस आणि एन.आय.ए. सारख्या विविध संस्थांचा समावेश आहे. 2025 मध्ये, 2024 च्या तुलनेत सर्वाधिक अटक घुसखोरांची करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबईतील सुरक्षा यंत्रणा घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये अधिक सक्रिय आणि प्रभावी ठरत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
- Beed Crime: संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच झाडाखाली बबलुला संपवलं अन् पोलिसांसमोर हजर झाले
- वादानंतर राकेशने गौरीवर चाकूने वार केले; मृत समजून सुटकेसमध्ये भरलं पण...; ती सुटकेसमध्ये जिवंत होती, फॉरेन्सिक अहवालात माहिती आली समोर
























