एक्स्प्लोर
Tomato Price: टोमॅटोला फक्त 80 पैसे भाव! संतप्त शेतकऱ्यांचे लातूर भाजी मंडईत आंदोलन
टोमॅटोला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली.

Tomato Price
1/9

मात्र मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने सध्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
2/9

शेतकरी हा कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी घेरलेला आहे.
3/9

टोमॅटोच्या पिकासाठी औषधाचा वाढणारा खर्च आणि लागणारी मजुरी, वाहतुकीचा खर्च हे सर्व करूनही टोमॅटोला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे.
4/9

सध्या लातूर बाजार समितीत टोमॅटोला अवघा 80 पैसे भाव मिळतोय.
5/9

महिन्याभरापूर्वी 25 ते 30 किलोच्या कॅरेटला 25 ते 150 रुपये पर्यंतचा भाव मिळाला आहे.
6/9

निचांकी भाव मिळत असल्याने विकण्यापेक्षा तो फेकून देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची झालीय.
7/9

सर्वत्र बंपर पीक निघाल्याने टोमॅटोला मागणी कमी आणि आवक जास्त झाली आहे.
8/9

लागवड, मजुरी, वाहन खर्च निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकला आहे
9/9

शेतकऱ्यांना त्यांनी खर्च केलेले पैसे परत मिळत नाहीयेत. शेतात केलेली मेहनत वेगळीत, त्याचं मोलच नाही.
Published at : 11 Sep 2023 09:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
