एक्स्प्लोर
Latur News : लातूरमध्ये बँक कर्मचाऱ्यांच कँडल मार्च, राष्ट्रीयकृत बँकेतील दोन लाख पदे तात्काळ भरण्याची मागण
Latur News : राष्ट्रीयकृत बँकेतील दोन लाख पदे तात्काळ भरावी या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा लातूर येथे कँडल मार्च काढण्यात आला.

Latur News
1/9

राष्ट्रीयकृत बँकेमध्ये दोन लाख पेक्षा जास्त जागा ह्या रिक्त आहेत. या जागा तात्काळ भराव्यात या मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला आहे.
2/9

कायमस्वरूपी नोकर भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सरकार काम करून घेत आहे. याचा थेट फटका ग्राहकांना बसत असल्याचं सांगण्यात येतंय.
3/9

बँकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
4/9

गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी लातूर शहरातील राष्ट्रीयकृत बँकेतील जवळपास 100 कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाज संपल्यानंतर कॅन्डल मार्च काढला.
5/9

या मागचं मुख्य कारण होते राष्ट्रीयकृत बँकेत दोन लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. शिपाई आणि क्लरक पदाच्या रिक्त जागा आहेत.
6/9

मागील अनेक वर्षापासून या जागा सरकार भरत नाहीये. त्या ठिकाणी नऊ ते दहा हजार रुपये वर काम करणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये.
7/9

दोन लाख पदे रिक्त ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण करून हा नफा कमवला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय?
8/9

देशातील बेरोजगारीचे प्रमाण 10.40 टक्के आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मागील दहा वर्षात कधी नव्हे एवढा नफा कमवलेला आहे.
9/9

स्थिती स्पष्ट असताना मग सरकार दोन लाख लोकांना कायमची नोकरी का देत नाही? असे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलनाची भूमिका घेत असल्याचं स्पष्टीकरण आंदोलकांनी दिलं.
Published at : 23 Nov 2023 11:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
