एक्स्प्लोर
रब्बी पिकं धोक्यात, पाण्याच्या कमतरतेमुळं बळीराजा चिंतेत
राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत.
Maharashtra Weather News
1/9

राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण पाण्याअभावी रब्बी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
2/9

आता पिकांची उगवण झाली असताना विहीर, बोअरलने तळ गाठला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत.
3/9

प्रकल्पातून पाणी मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळं पिके कशी जोपासली जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.लातूर जिल्ह्यातील दोन लाख 50 हजार हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यात आली आहेत.
4/9

पाण्याअभावी पिकं मान टाकत आहेत. शासन दरबारी रब्बी पेरणीच्या टक्केवारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी, प्रत्यक्ष बांधावरची स्थिती ही वेगळीच आहे.
5/9

पिकं वाया जाण्याच्या मार्गावर असल्यानं बळीराजा चिंतेत आहे.
6/9

जमिनीतील ओल उडून जाईल, या भीतीने खरीप पिकांची काढणी होताच मशागत न करता शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली होती. जिल्ह्यात सरासरीच्या 80 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद आहे.
7/9

पाण्याअभावी उगवण होताच पिकांनी माना टाकल्या आहेत. हंगामी नाही किमान अवकाळी पाऊस तरी तारेल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र प्रतिकूल वातावरणामुळे रबीची आशा धुसर झाली आहे.
8/9

यावर्षी पावसानं प्रमाण कमी आहे. बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळं विहीर आणि बोर यांनी देखील तळ गाठला आहे.
9/9

लातूर जिल्ह्यामध्ये सर्वच प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प आहे. यामुळं प्रशासनानं या ठिकाणी पाण्याच्या मोटरी लावण्यासाठी बंदी घातली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे.
Published at : 22 Nov 2023 12:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion