एक्स्प्लोर
Car Insurance : वाहन विमा खरेदी करताना हे नियम जाणून घ्या, अन्यथा फेटाळला जाईल दावा

1
1/7

सध्या प्रत्येक व्यक्ती कार किंवा कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर प्रथम त्याचा विमा उतरवतो. कार विकत घेतल्यानंतर, तिचा विमा उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास विम्यामुळे हे नुकसान भरून काढता येते.
2/7

वाहन चोरीला गेल्यानंतरही विम्याची रक्कम मिळते. वाहन विमा पॉलिसी घेतल्यानंतर, चोरी किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास दावा मिळाला नसल्याचा दावा अनेकजण करतात.
3/7

वाहन विम्याचा दावा नाकारण्यामागे अनेक कारणे आहेत. काही चुकांमुळे वाहन विमा दावा फेटाळला जातो.
4/7

तुमची कार व्यावसायिक वापरासाठी वापरत असाल, तर अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास तुम्हाला दावा मिळणार नाही. तुम्ही कार व्यावसायिकरित्या वापरत असाल तर तुम्हाला यासाठी वेगळा विमा घ्यावा लागेल. अन्यथा तुमचा विमा नाकारला जाऊ शकतो.
5/7

अनेकदा लोक कार खरेदी केल्यानंतर त्यात बदल करून घेतात. पॉलिसीचे नूतनीकरण करताना कारमध्ये केलेले बदलांची माहिती संबंधित विमा कंपनीला द्यावी. अन्यथा कंपनी दावा फेटाळू शकते.
6/7

कार विमा पॉलिसी घेतल्यानंतर, तिचा प्रीमियम नियमितपणे भरत रहा. बहुतांशी विमा कंपन्या ग्राहकांना विमा प्रीमियम भरण्यासाठी ९० दिवसांचा अतिरिक्त वेळ देतात. विमा प्रीमियम रक्कम वेळेवर न भरल्यास कोणत्याही अपघाताच्या बाबतीत तुमचा दावा फेटाळला जाईल.
7/7

वाहन चालवण्याचा परवान्याशिवाय वाहन चालवणे कायद्यानुसार गुन्हा आहे. तुम्ही परवान्याशिवाय वाहन चालवताना किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि विम्यासाठी दावा केल्यास तो फेटाळला जाऊ शकतो.
Published at : 28 Mar 2022 08:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
