धक्कादायक! समृद्धी महामार्गावरील लोखंडी अँगल तुटला, अनेक वाहनांचे टायर फुटले, मोठे अपघात होण्याची शक्यता
समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Highway) मुंबई कॉरीडोरवरील चेनेज 320 /9 जवळील पुलावर लोखंडी अँगल तुटून वर आल्याने अनेक वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली आहे.

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Highway) मुंबई कॉरीडोरवरील चेनेज 320 /9 जवळील पुलावर लोखंडी अँगल तुटून वर आल्याने अनेक वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली आहे. यामुळं वाहने महामार्गावरच अडकली आहेत. अर्धा तास होऊनही प्रवाशांना समृद्धी महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. काही वाहनांचे दोन टायर फुटल्याने अनेक वाहने रस्त्यातच आहेत. त्यामुळं अपघाताची शक्यता बळावली आहे.
प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण
भरधाव वाहने महामार्गावरील पुलाच्या वर आलेल्या अँगलला धडकून टायर फुटले. मात्र, सुदैवाने कोणतेही मोठे अपघात या ठिकाणी झाले नाहीत. प्रवासी महामार्गावरच अडकल्याने व रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण आहे. महामार्ग पोलीस किंवा क्विक रिस्पॉन्स व्हेईकल अद्याप घटनास्थळी पोहोचले नाहीत. विशेष म्हणजे आजच समृद्धी महामार्गावरील टोल 19 टक्क्याने वाढवण्यात आला आहे. दरम्यान, टायर फुटलेली सर्व वाहने सध्या दुसर बीड येथील टोल प्लाजावर लावण्यात येत आहे.
गेल्या वर्षीही याच पुलावर अशाप्रकारे अँगलचा तुकडा बाहेर वाहनांचे टायर फुटले होते
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीही याच पुलावर अशाप्रकारे अँगलचा तुकडा बाहेर येऊन अनेक वाहनांचे टायर फुटले होते. त्यावेळीही "एबीपी माझानेच" हा धक्कादायक प्रकार समोर आणला होता. त्यानंतर आता पुन्हा महामार्गावरील पुलाच्या वर लोखंडी अँगल आल्याने अनेक वाहनांचे टार फुलटे आहे. यामध्ये सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही. पण टायर फुटल्यानं अनेक वाहनं महामार्गावरच उभी आहेत, त्यामुळं अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई नागपूर महामार्गाचं काम केलं
तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक ते दीड वर्षच झालं आहे, तोच महामार्गाला काही ठिकाणी मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच समृद्धी महामार्ग हा काही साधासुधा महामार्गही नाही. या ठिकाणी गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात. राज्याच्या विकासाच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा, मात्र या समृद्धीवर आता मृत्यूचे सापळे तयार झालेत. समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं दिसून आलं. यावरुन विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध
























