एक्स्प्लोर

समीरच्या गालावर सईची पप्पी; 'चल जाऊ डेटवर' गाण्यावर रोमान्स

Sai Tamhankar and Samir Choughule, Chal Jau Date Var Video Song : 'चल जाऊ डेटवर' गाण्यावर सई-समीरचा रोमान्स; दिल गालावर चुंबन

Sai Tamhankar and Samir Choughule,  Chal Jau Date Var Video Song : काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित 'गुलकंद'मधील 'चंचल' हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. 'चंचल' गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं 'चल जाऊ डेटवर' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे. 

गाण्यात सई ताम्हणकर आणि समीर चौगुले यांची भन्नाट केमिस्ट्री दिसत असून समीर आणि सईचे नृत्य एक सरप्राईज आहे. सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार,  याची उकल 1 मे 2025 ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे. तोवर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की!

दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, "या गाण्यातील  सई, समीर आणि प्रसाद, ईशा यांची केमिस्ट्री मजेशीर असून प्रेक्षकांना हसवणारी आहे. गाण्याचे बोल, संगीत सगळंच खूप छान आहे. एक वेगळाच मूड बनवणारं हे गाणं असल्यानं त्याचं चित्रीकरण तसंच होणं गरजेचं होतं. मस्त कलरफुल ठिकाणी चित्रित करण्यात आलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. गाण्यात सई -समीर जरी डेटवर जात असल्याचे दिसत असले तरी १ मे रोजी सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह ही डेट एन्जॉय करावी.’’ 

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, " चित्रपट यशस्वी करण्यात गाण्यांचा मोठा सहभाग असतो. कधी कधी कथेतून जी गोष्ट, भावना मांडता येत नाहीत त्या गाण्यातून मांडता येतात. असंच हे गंमतीशीर गाणं आहे. हे या चित्रपटातील दुसरं गाणं आहे. पहिले गाणं रोमँटिक होते, हे गाणं अतिशय एनर्जेटिक असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. चित्रपट पाहातानाही प्रेक्षक हे गाणं अतिशय एन्जॉय करतील.'' 

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

6 वेळा सिरियस रिलेशनमध्ये तरीही अधुरी प्रेम कहाणी, पन्नाशी गाठेपर्यंत अफेअर्स करण्याची इच्छा! बॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Virat Kohli : कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
Embed widget