एक्स्प्लोर

मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून ई-बाईकचा पर्याय आणला जात आहे. या ई-बाईकच्या दरांबाबत अद्याप निश्चित झालेलं नाही.

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज संपन्न झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून ई-बाईक संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात ई-बाईक धोरण स्वीकारला जाईल, राज्यात लवकरच बाईक टॅक्सी सुरू होईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिली. महिला सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली बनवली जात आहे. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या जातील, असेही सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून ई-बाईकचा पर्याय आणला जात आहे. या ई-बाईकच्या दरांबाबत अद्याप निश्चित झालेलं नाही. दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 10 हजार रुपयांचे अनुदान द्यायचा प्रयत्न शासन करत आहे. त्यामुळेच, 10 हजारांहून अधिक रोजगार मुंबईतच निर्मिती होणार आहेत, याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, अशी माहितीही परिवहन मंत्र्‍यांनी दिली. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

पुणे-शिरूर-अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा आणि काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या 2008 पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर.

अजनी, नागपूर येथील देवनगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या जागेवरील क्रीडांगणांचे आरक्षण रहिवासी करण्याचा निर्णय.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 500 शेतकऱ्यांना धानासाठी पणन हंगाम 2020-21 करिता प्रोत्साहनपर 79 लाख 71 हजार 292 रुपयांचे अनुदान मंजूर.

सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 17.30 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.

सिंदफणा नदीवरील टाकळगाव (हिंगणी) ता. गेवराई जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 19.66 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.

वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी 1 हजार 886 कोटी 5 लाख कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता, यातील 943.025 कोटी इतकी 50% रक्कम राज्य सरकार देणार.

बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण :

1 लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात रमानाथ झा समिती शिफारशी सुधारणेसह लागू करणार.

नागन मध्यम प्रकल्प, जिल्हा नंदूरबार प्रकल्पासाठी 161.12 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता.

सिंदफणा नदीवरील निमगाव ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापूरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 22.08 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.

मार्वल - महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजीलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोसर्मेंट लि. शक्ति प्रदत्त समितीच्या अधिपत्याखाली, कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामे प्राधान्याने देणार.

• गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज व विशिष्ट औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करणार, यासाठीच्या प्रारूप अधिनियमास मान्यता.

• नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगाने सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णय.

हेही वाचा

श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सत्ता सोडावी लागेल, भाजपच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, रोहित पवारांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला टोला
मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सत्ता सोडावी लागेल, भाजपच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, रोहित पवारांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला टोला
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
Mhasla Nagarpanchayat : रायगडच्या राजकारणात खळबळ! चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा; शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?
चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा; शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?
शिवसेनेच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकीय वातावरण तापलं, गुन्हा दाखल  
शिवसेनेच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकीय वातावरण तापलं, गुन्हा दाखल  

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget