BCCI Central Contract : टीम इंडियामध्ये पुन्हा खेळण्याचं स्वप्नच राहणार.... इशान किशनला बीसीसीआयचा ठेंगा; करारनाम्याबद्दल मोठा खुलासा
Ishan Kishan BCCI Central Contract : गेल्या वर्षी श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोघांनाही स्थानिक क्रिकेट न खेळल्याबद्दल बीसीसीआयने केंद्रीय करार यादीतून वगळले होते.

Ishan Kishan BCCI Central Contract : बीसीसीआयच्या केंद्रीय कराराची यादी अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत अपडेट असे आहे की ते ए+ ग्रेडमध्येच राहतील. श्रेयस अय्यरला त्याचा करार परत मिळणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनच्या भविष्याबद्दलही बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोघांनाही स्थानिक क्रिकेट न खेळल्याबद्दल बीसीसीआयने केंद्रीय करार यादीतून वगळले होते.
BIG UPDATE FOR BCCI CENTRAL CONTRACT..!!( Sports Tak/ ANI)🚨
— MANU. (@IMManu_18) April 1, 2025
- Rohit Sharma & Virat Kohli Set retained at A+ Grade
- Ravindra Jadeja also retained A+ Grade
- Varun Chakravarthy set to get A Grade
- Ishan kishan is waiting pic.twitter.com/6LryE1WRD9
मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय श्रेयस अय्यरला पुन्हा करारात घेणार आहे. दुसरीकडे, इशान किशनला त्याचा करार परत मिळण्यासाठी वाट पहावी लागू शकते. किशनला शेवटचा नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाकडून खेळताना दिसला होता.
BIG UPDATES ON BCCI CENTRAL CONTRACT:
— CHIKU JI❤️💫 (@MaticKohli251) April 1, 2025
- Kohli, Rohit, Bumrah set retained at A+ Grade.
- Jadeja likely retains their A+ Grade.
- Shreyas is set to be back at A Grade.
- Varun Chakravarthy set to get a contract.
- Wait for Ishan Kishan.#IPL2025 pic.twitter.com/FCXBKbEuu8
इशान किशनला बीसीसीआयचा ठेंगा
रिपोर्टनुसार, "इशान किशनला त्याचा केंद्रीय करार परत मिळविण्यासाठी वाट पहावी लागेल. कारण अद्याप त्याला केंद्रीय करार यादीत परत आणण्यासाठी पुरेशी चांगली कामगिरी केलेली नाही."
बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून वगळल्यानंतर इशान किशनने आयपीएल 2024 मध्ये फक्त 23 च्या सरासरीने 320 धावा केल्या. याशिवाय, किशनला देशांतर्गत सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करता आलेली नाही. 2024 पासून किशनची टी-20 मधील सरासरी फक्त 28.04 आहे. रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त, तो भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही चांगली कामगिरी करू शकला नाही.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरबद्दल बोलायचे झाले तर, तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने स्पर्धेत 243 धावा केल्या. केंद्रीय करार यादीतून वगळल्यानंतर अय्यरने आयपीएल 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला चॅम्पियन बनवले.
हे ही वाचा -





















