Hardik Pandya And Jasmin Walia: हार्दिक पांड्या अन् जास्मिन वालियाचं ठरलं; खेळाडूंच्या बसमध्ये बसली, सामना संपताच काय घडलं?, VIDEO
Hardik Pandya And Jasmin Walia IPL 2025: वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया देखील उपस्थित होती.

Hardik Pandya And Jasmin Walia IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात (IPL 2025) काल (31 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders) यांच्यात सामना खेळवण्यात आला. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज बाजी मारत मुंबईने आपल्या गुणांचे खाते उघडताना गतविजेत्या कोलकाताचा 8 विकेट्सने धुव्वा उडविला.
नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या मुंबईने कोलकाताला 16.2 षटकांत 166 धावांत गुंडाळले. यानंतर केवळ 12.5 षटकांत 2 बाद 121 धावा करत मुंबईने दिमाखात बाजी मारली. आयपीएल पदार्पणात 4 बळी घेणारा अश्वनी कुमार सामनावीर ठरला. मुंबई आणि कोलकाताचा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया (Jasmin Walia) देखील उपस्थित होती. सामना संपल्यानंतर जास्मिन वालिया मुंबई इंडियन्सच्या बसमध्ये बसतना दिसत आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालियाचं ठरलं, VIDEO:
हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड प्रेयसी जास्मिन वालिया त्याला आणि संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टँडमध्ये उपस्थित होती, पण सामन्यानंतर ती मुंबई इंडियन्सच्या टीम बसमध्ये देखील दिसली. आयपीएल सामन्यांदरम्यान, अनेक खेळाडूंचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे. आयपीएल फ्रँचायझी हॉटेल ते स्टेडियम किंवा विमानतळापर्यंत प्रवास करण्यासाठी खेळाडूंच्या बससह कुटुंब बसची व्यवस्था देखील करते. कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर जास्मिन वालिया खेळाडूंचे कोचिंग स्टाफ किंवा खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य प्रवास करत असलेल्या बसमध्ये बसलेली दिसली. जास्मिन वालिया मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य ज्या बसमध्ये चढत आहेत त्या बसमध्ये चढताना दिसत आहे. जास्मिनच्या आधी, दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज बसमध्ये चढताना दिसते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालियाचा अधिकृत ठरल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
View this post on Instagram
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकचा घटस्फोट-
भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकचा घटस्फोट झाला. 18 जुलै 2024 रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. हार्दिक आणि नताशाला एक मुलगा आहे. या मुलाचे दोघंही मिळून सांभाळ करताय.





















