एक्स्प्लोर

शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

राजू शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा कळवला आहे. त्यानुसार, मी व माझे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहोत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर शिवसेना उबाठा (Shivsena) पक्षाला आता महापालिका निवडणुकांच्या अगोदरच नेतेमंडळींचे धक्के बसत आहेत. कोकणानंतर आता मराठवाड्यात शिवसेना नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केलेल्या आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या राजू शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षाची साथ सोडली आहे. अखेर, राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत नव्या राजकीय प्रवेशाचीवाट धरली आहे. राजू शिंदे (Raju shinde) यांनी उद्धव ठाकरे गटाकडून संजय शिरसाठ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, राजीनामा देताना चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवत राजू शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह पदाचा आणि शिवसेना उबाठा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, मराठवाड्यात पुन्हा एकदा ठाकरेंना दे धक्का बसला आहे. 

राजू शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा कळवला आहे. त्यानुसार, मी व माझे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या व शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता व आपणही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली, त्या बद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत, असे राजू शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र, मी काही कारणास्तव आणि माजी खासदार चंद्रकांत खैर यांच्याबद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्यासह शिवसेना पक्षाचा व विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीत 1 लाखांच्यावर मतं

दरम्यान, राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी 16,351 मतांनी त्यांचा पराभव केला होता. राजू शिंदे यांना 1 लाख 6 हजार 147 मतं पडली होती. तर, संजय शिरसाठ यांना 1 लाख 22 हजार 498 मतं मिळाली होती. त्यामुळे,छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना युबीटी पक्षाचा चेहरा म्हणूनही राजू शिंदेंकडे पाहिले जात. मात्र, त्यांनी आता ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अद्याप काहीही जाहीर केले नाही. मात्र, ते सत्ताधारी महायुतीमधील एका पक्षात प्रवेश करतील, असा कयास लावला जात आहे.

हेही वाचा

दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला
सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
Embed widget