मुंबईच्या खार परिसरात नेपाळी गॅंगचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी चोरीच्या घटना, 3 जणांना पोलिसांनी केलं अटक
मुंबईच्या खार परिसरात नेपाळी गॅंगनं (Nepali gang) धुमाकूळ घातला आहे. बंद दुकानाचे शटर कापून चोरी करत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांनी
मुंबई : मुंबईच्या खार परिसरात नेपाळी गॅंगनं (Nepali gang) धुमाकूळ घातला आहे. बंद दुकानाचे शटर कापून चोरी करत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यामुळं खार पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करुन मीरा रोड नालासोपारा परिसरातून नेपाळी गॅंगमधील 3 सदस्यांना अटक केली आहे.
आरोपींवर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल
लक्ष्मण करण सिंग (25 वर्षे), महेश सुनील देवकर (25 वर्ष) एकिंदर रामसिंग जयघडी (19 वर्षे) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या टोळीत अजून काही सदस्य आहेत का? आणि या टोळीतील सदस्यांनी अजून कुठे चोरी केली आहे का? याबाबत खार पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी घरे आणि दुकाने फोडल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे. चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी गस्ती वाढवल्याचं चित्र देखील पाहयाला मिळत आहे. अशा चोरीच्या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्यानं केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
























