रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
देशभरात पुढील आठवड्यात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

परभणी : एकीकडे रमजान ईदचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे दुर्दैवी घटनेत एका मुस्लीम (Muslim) कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. रमजान ईद निमित्त साफसफाई करताना लोखंडी कुलरचा शॉक लागून सख्या जावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीच्या (Parbhani) पूर्णा तालुक्यातील गौर गावात घडली आहे. ईदच्या आधीच शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गौर गावातील नवी आबादी या भागात राहणाऱ्या शेख जहुराबी शेख ईसुब (वय 52) आणि बिस्मिल्लाबी शेख इस्माईल (वय 58) या दोघी सख्या जावा. मात्र, दुर्दैवाने या दोन्ही सख्ख्या जावांचा आज कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशभरात पुढील आठवड्यात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गावागावात ईफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकत्र येत आहेत. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत मुस्लिम बांधवांना ईदसाठी शुभेच्छा देत शक्य ती मदतही केली जात आहे. त्यामुळे, ईदचा उत्साह केवळ मुस्लिमांमध्येच नाही, तर हिंदूंमध्येही पाहायला मिळत आहे. त्यामुळे, रमजान ईदनिमित्त घराची साफ-सफाई करत असताना दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील गौर गावातील शेख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील दोन महिला, घरात साफसफाई करत होत्या. त्यावेळी, घरात सुरू असलेल्या लोखंडी कुलरचा शॉक लागल्याने या दुर्घटनेत दोन्ही सख्ख्या जावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गौर गावातील शेख कुटुंबावर ऐन ईदच्या अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी तत्काळ शेख यांची घरी धाव घेतली.
हेही वाचा
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
