Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या प्रकरणात गोवण्यासाठी उभ्या केलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच पोलीस प्रकरण दडपत असल्याचाही आरोप अंजली दमानिया यांनी केला. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आजपासून नवे दर लागू होती. यासह दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जालन्यात धक्कादायक घटना, मोबाईल साठी 13 वर्षाच्या मुलाकडून आईची हत्या...
जालना -
मोबाईल साठी 13 वर्षाच्या मुलाकडून आईची हत्या...
पाण्यात टाकून मोबाईल खराब केल्याचां राग, 13 वर्षाच्या मुलाकडून आईचा खून..
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या 'अंतरवाली टेंभी' गावची घटना...
25 मार्च रोजी शेतात 13 वर्षाच्या मुलाने आपली आई मयत मीराबाई बोंडारे यांच्या डोक्यात दगड घालून खून केला होता..
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड..
अँकर -पाण्यात टाकून आईने मोबाईल खराब केल्याचा राग मनामध्ये धरून एका तेरा वर्षाच्या मुलाने आईची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे..
घनसावंगी तालुक्यातल्या टेंभी अंतरवाली गावामध्ये 25 मार्च रोजी मिराबाई बोंडारे या 41 वर्षीय महिलेच्या खूनाची घटना उघडकीस आली होती, पोलीस आरोपीचा मागोवा काढन्याचा बराच प्रयत्न करत असताना, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मयत महिलेच्या मुलाची यात चौकशी केली, या चौकशीत या मुलाने खुनाची कबुली दिली.. याप्रकरणी या विधीसंघर्ष मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे
जालना -जिल्ह्यात अवकाळी पावसाची हेजरी, शेतकऱ्यांची धावपळ...
ढगाळ वातावरणामुळे, फळबागांना फटका बसण्याची शक्यता..
जालना जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पासून तीन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. याच अंदाजानुसार 4 च्या सुमारास जालना जिल्ह्यातील बदनापूर जाफराबाद तालुक्यातील काही भागात अचानक पावसाने पाठ हजेरी लावली, परिणामी काढणीला आलेली पिक तसेच फळ पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे..
महत्त्वाच्या बातम्या





















