Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
कामराने केलेल्या विडंबन गीतानंतर आता देशात त्याचे पडसाद उमटत असतानाच अमेरिकेतील न्यूयाॅर्क टाईम्समध्येही भाष्य करण्यात आलं आहे. विनोदवीरांना विनोद करणं किती कठिण आहे याचा उहापोह करण्यात आला आहे. अ

Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत केल्यानंतर मुंबईच्या खार पोलिसांनी बुधवारी विनोदी अभिनेता कुणाल कामरा याला दुसरे समन्स बजावलं आहे. वृत्तसंस्थेनुसार, बीएनएस कलम 35 अंतर्गत हे समन्स पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी कामराला समन्स बजावले होते. त्याला सकाळी 11 वाजता खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र, कामराच्या वकिलाने सात दिवसांचा अवधी मागितला. मात्र पोलिसांनी नकार दिला. दरम्यान, कामराने केलेल्या विडंबन गीतानंतर आता देशात त्याचे पडसाद उमटत असतानाच अमेरिकेतील न्यूयाॅर्क टाईम्समध्येही (New York Times on Kunal Kamra) भाष्य करण्यात आलं आहे. भारतात विनोदवीरांना विनोद करणं किती कठिण आहे याचा उहापोह करण्यात आला आहे. अलीकडेच पीएम मोदी यांनी केलेल्या पाॅडकास्टमधील उदाहरण सुद्धा देण्यात आलं आहे.
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
काय म्हटलं आहे न्यूयाॅर्क टाईम्समध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये जाहीर केले की, "टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे यावर माझा ठाम विश्वास आहे." परंतु पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसारख्या विरोधी पक्षांनी राजकीय टिप्पण्यांमुळे लोकांना तुरुंगात टाकले आहे, त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की जर तुम्ही त्यांच्या बाजूने आलात तरच बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. भारतातील राजकारण्यांवर टीका करणाऱ्या शेवटच्या विनोदी कलाकारांपैकी एक असलेला विनोदी कलाकार कुणाल कामराने सोमवारी एक निवेदन जारी करून असे म्हटले आहे की तो घाबरणार नाही, असेही लेखात म्हटलं आहे.
👀👀👀 pic.twitter.com/C5Bnn81p5E
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 25, 2025
विडंबन गीतानंतर जीवे मारण्याच्या धमक्या
दुसरीकडे, कॉमेडियन कुणाल कामराला शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबन गीतानंतर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामराला किमान 500 धमकीचे कॉल आले आहेत. ज्यामध्ये लोकांनी त्याला जीवे मारण्याची आणि त्याचे तुकडे करण्याची धमकी दिली आहे. 36 वर्षीय स्टँड-अप कॉमेडियनने त्यांच्या शोमध्ये शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा समाचार घेतला होता. कामरानं 'दिल तो पागल है' चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन केले होते, ज्यात शिंदे यांना गद्दार म्हटले होते. मात्र, शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. दरम्यान, कुणाल कामराने 25 मार्च रोजी सोशल मीडियावर आणखी एक नवीन विडंबन गाणे पोस्ट केले. त्याने 'हम होंगे कामयाब'ची ओळ बदलून 'हम होंगे कंगाल एक दिन' अशी केली.
🍿 🍿 🍿 pic.twitter.com/KiDBbvaxSL
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 26, 2025
कामराविरोधात एफआयआर दाखल
24 मार्च रोजी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम विधानसभेत म्हणाले की, कॉमेडियन कुणाल कामराचे कॉल रेकॉर्डिंग, सीडीआर आणि बँक स्टेटमेंटचीही चौकशी केली जाईल. यामागे कोण आहे ते शोधून काढू. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पथकाने युनिकॉन्टिनेंटल हॉटेलवर कारवाई केली. शिवसेना (शिंदे) कार्यकर्त्यांनी या विडंबनाला आक्षेपार्ह टिप्पणी मानले आणि रविवारी रात्री युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची तोडफोड केली. एकूण 40 शिवसैनिकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.























