LSG vs PBKS IPL 2025 : प्रभसिमरन सिंगनंतर श्रेयस अय्यरनं ठोकले अर्धशतक, पंजाबनं लखनौचा आठ विकेट्सने केला पराभव
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 13 व्या सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Background
Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Cricket Score : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 13 व्या सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघ 2 पैकी 1 सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचा संघ 1 पैकी 1 सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवाने लखनौ सुपर जायंट्सच्या प्रवासाची सुरुवात झाली. यानंतर त्याने सनरायझर्स हैदराबादला हरवले. कर्णधार ऋषभ पंतकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून आपला प्रवास सुरू केला. त्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली होती.
पंजाबनं लखनौचा आठ विकेट्सने केला पराभव
पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला. त्यासाठी नेहल वधेराने कर्णधार श्रेयस अय्यरसह चमकदार कामगिरी केली. प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यरने धमाकेदार अर्धशतक झळकावले. लखनौने पंजाबला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात, पंजाबने 16.2 षटकांत लक्ष्य गाठले.
प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 7 गडी गमावून 171 धावा केल्या. यादरम्यान निकोलस पूरनने 44 धावांची खेळी खेळली. आयुष बदोनीने 41 धावांचे योगदान दिले. एडेन मार्क्रम 28 धावा करून बाद झाला. अब्दुल समदने 27 धावांचे योगदान दिले.
लखनौने पंजाबसमोर ठेवले 172 धावांचे लक्ष्य
लखनौने पंजाब किंग्जसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
लखनौकडून आयुष बदोनीने 33 चेंडूत 41 धावा केल्या. निकोलस पूरनने 44 धावांची खेळी केली. त्याने 30 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकार आणि 2 षटकार मारले. अब्दुल समदने 27 धावांचे योगदान दिले.
पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने 3 विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकांत 43 धावा दिल्या. फर्ग्युसन, मॅक्सवेल, मार्को जॅन्सन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.




















