Sayaji Shinde Meet Santosh Deshmukh Family: गोष्टी परत परत काढल्या तर त्यांचा त्रास होतो; सयाजी शिंदेंकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Sayaji Shinde Meet Santosh Deshmukh Family: अभिनेते सयाजी शिंदेंकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली गेली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, जो रोज-रोज मारला जातोय, तो रोज-रोज कसा जिवंत राहील? याचा विचार करतोय, असं सयाजी शिंदे म्हणाले.

Sayaji Shinde Meet Santosh Deshmukh Family: बीडमधील (Beed) मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणात सध्या अनेक खळबळजनक खुलासे होते आहेत. अशातच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सयाजी शिंदेंनी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची सांत्वनपर भेट घेतली आहे. देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा. मला देशमुख कुटुंबाची काळजी होती, म्हणून भेट घेतली, असं सयाजी शिंदे म्हणाले आहेत. तसेच, गोष्टी परत परत काढल्या तर त्यांचा त्रास होतो, असंही सयाजी शिंदे म्हणाले आहेत.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "आम्ही त्यांच्यासोबत आहोत, आपण नेहमीच चांगल्या माणसांसोबत असलं पाहिजे. प्रत्येक्ष भेटून बोलायचं होतं, मुलाशी... त्यामुळे भेटलो, बोललो. न्यायाच्या गोष्टी होत राहतीलच, व्हायलाच पाहिजेत. लवकर होतील अशी अपेक्षा ठेवुयात. पण, त्यापलिकडे आम्ही विचार करतोय की, संतोषचं चांगुलपणा कसा टिकवायचा. संतोष राहील आमच्यासोबत, सर्वांसोबत..."
"देशमुख कुटुंबाची काळजी होती म्हणून भेट घेतली, जो रोज रोज मारला जातोय. तो रोज रोज कसा जिवंत राहील? याचा विचार आम्ही करत आहोत. देशमुख कुटुंबाची काळजी होती, म्हणून आज मी त्यांची भेट घेतली. सांत्वन केलं, न्यायाच्या गोष्टी होत राहतील, लवकर होतील यापेक्षा ठेवू त्या पलीकडे आम्ही विचार करतोय संतोषचा चांगुल पण कसा टिकवायचा यासाठी विचार करत आहोत.", असं सयाजी शिंदे म्हणाले.
"एक माणूस एकदा मरतो आणि पण हा आत्मा असा आहे जो रोज रोज मारला जातोय. आम्ही रोज रोज कसा जिवंत राहिले याचा विचार आम्ही करत आहोत.", असंही सयाजी शिंदे म्हणाले.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या घटनेने राज्यातील राजकारण देखील मोठ्या प्रमाणावर तापलं. या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर याप्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिली आहे. तसेच, याप्रकरणामागे वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचा बोललं जात आहे.
पाहा व्हिडीओ :























