एक्स्प्लोर
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी गत आर्थिक वर्षात भरभरुन दान दिलं आहे. त्यामुळेच, गेल्या वर्षभरात श्री सिद्धिविनायक ट्रस्टचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Shri sidhhivinayak temple donation
1/8

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी गत आर्थिक वर्षात भरभरुन दान दिलं आहे. त्यामुळेच, गेल्या वर्षभरात श्री सिद्धिविनायक ट्रस्टचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
2/8

श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च 2025 रोजी संस्थानचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025-26 चे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक 31 मार्च 2025 रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.
3/8

न्यासाचे सर्व विश्वस्त, प्रशासन यांची नियोजनबध्द कार्यपध्दती आणि भाविकांच्या भक्तीमय सहभागामुळे सन 2024-25 या वर्षात न्यासाचे उत्पन्न जे रू 114 कोटी इतके अपेक्षित होते ते विक्रमी रू 133 कोटींच्या घरात गेले आहे.
4/8

मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास 15% नी वाढ झालेली आहे. सन 2024-25 साठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न रू 114 कोटी इतके धरण्यात आले होते.
5/8

आशिर्वचन पूजा देणगी, लाडू व नारळवडी यासंदर्भात विश्वस्त व प्रशासन यांच्या नियोजनामुळे उत्पन्न रू 114 कोटीवरून रू 133 कोटीच्या घरात गेले आहे, ही प्रशंसनीय बाब आहे.
6/8

सन 2025-26 या पुढील वर्षासाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न रू 154 कोटी इतके गृहीत धरण्यात येत आहे. त्यामुळे, यंदाच्या वर्षीही भाविक भक्तांकडून गणरायाचरणी भरुभरुन दान, देणगी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
7/8

दरम्यान, यंदा न्यासकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी "श्रीसिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना" राबविण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्याबाबत घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
8/8

श्री सिद्धिविनायक न्यासास प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून गरीब व गरजू रूग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करण्याबाबत पुस्तक पेढी योजना राबविणे, डायलेसिस सेंटरद्वारे रूग्णांना मदत करणे इत्यादि स्वरूपाचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
Published at : 01 Apr 2025 03:08 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
क्रिकेट


















