एक्स्प्लोर
Advertisement

Global Family Day 2023 : कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारा 'जागतिक कुटुंब दिन'
Global Family Day 2023 : 'जागतिक कुटुंब दिन' हा दिवस साजरा करण्यासाठी वर्षाचा पहिला दिवस निवडण्यात आला आहे

Global Family Day 2023
1/9

जागतिक कुटुंब दिन (Global Family Day) दरवर्षी 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या दिवशी साजरा केला जातो.
2/9

आजच्या न्यूक्लिअर फॅमिली पद्धतीत कौटुंबिक फॅमिली किती महत्त्वाची आहे. हे म्हणणं अधोरेखित करणारा हा दिवस आहे.
3/9

आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, मुलांचे हक्क आणि सामाजिक समावेश यासारख्या कुटुंबांच्या कल्याणासाठी केंद्रस्थानी असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून कुटुंबपद्धती, एकता, प्रेम, जिव्हाळा याचा प्रचार केला जातो.
4/9

आजच्या काळात जिथे अर्धा अधिक वेळ कामात घालवला जातो. कामाच्या तणावात जातो. ही परिस्थिती लक्षात घेऊन जागतिक कुटुंब दिनाची स्थापना करण्यात आली आहे.
5/9

जागतिक कौटुंबिक दिन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या उद्देशाने की या दिवसाच्या माध्यमातून जगभरातील सर्व देश, धर्म यांच्यात शांतता प्रस्थापित करता येईल आणि युद्ध आणि अहिंसा टाळता येईल.
6/9

याबरोबरच कुटुंबालाही खूप महत्त्व देण्यात आले आहे. कारण कुटुंबातूनच शांतता प्रस्थापित होऊ शकते. विविध संस्कृती, धर्म, भाषा, परंपरा असतानाही हे जगाचे कुटुंब आहे आणि कुटुंबात युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये.
7/9

प्रेमळ कुटुंबासाठी शांतता आवश्यक आहे, म्हणून या दिवसाची स्थापना करण्यात आली आहे. आणि हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
8/9

आजच्या काळात एकमेकांसोबत घालवायला कोणालाच वेळ नाही. तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून कुटुंबाबरोबर वेळ घालवणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
9/9

हा दिवस साजरा करण्यासाठी वर्षाचा पहिला दिवस निवडण्यात आला आहे कारण याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवून नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक भावनेने करू शकता आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रोत्साहन देऊ शकता.
Published at : 01 Jan 2023 02:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
