Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंच्या सुरेश धस यांना कानपिचक्या
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंच्या सुरेश धस यांना कानपिचक्या
हेही वाचा :
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ज्यांनी वाचा फोडली ते आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात पीडित देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरोपींच्या अटकेची मागणी करत आहेत. त्यानंतर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये मोर्चा काढला होता. त्यामध्येही धस यांनी त्यांच्यास्टाईलने भाषण करत बीडमधील दोन्ही मंत्र्यांवर हल्लाबोल केला. मात्र, दुसरीकडे यासंदर्भाने टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) नाव घेतल्याने वेगळाच वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांची तक्रारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता, सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळी व संतोष देशमुख प्रकरणावर पुन्हा भाष्य केलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी पाठक हे जवळपास एक महिना प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ते आजच रुजू झाले आहेत. त्यामुळे, जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पाठक यांची भेट घेऊन संतोष देशमुख यांच्या खूनासंदर्भात चर्चा केली. बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्यासंदर्भात धस यांनी चर्चा करुन हे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर, तपास करुन 1 हजार परवाने रद्द करण्याचं आश्वासनही धस यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील 8 ते 15 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, असेही धस यांनी म्हटलं. लोकप्रतिनीधींनीही शिफारस केल्याची नोंद असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. माझं नाव कुठं आढळून आल्यास माझ्यावरही करावी. कारण, मी स्वत: अद्याप बंदुक वापरत नाही. केवळ दोन परवान्यांसाठी मी शब्द टाकला होता, तेही श्वापदांपासून बचावासाठी म्हणून एका डॉक्टरांना ही बंदुक मिळावी म्हणून आपण शिफारस केल्याचंही धस यांनी म्हटलं.