एक्स्प्लोर

BLOG : किरण ठाकूर; शांत आणि तरीही स्पष्ट

Kiran Thakur, BLOG : ठाकूर सर कमी बोलायचे. ऐकण्यावर त्यांचा भर असायचा . पत्रकारांसाठी तसा हा दुर्मिळ गुण . रानडे इन्स्टिट्यूट च्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांचा दरारा किंवा जरब वाटायची नाही. वाटायचा तो आपलेपणा . वर्गात आले की समोरच्या विद्यार्थ्यांवर एक मिश्किल नजर फिरवायचे . पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेले अनेकजण सुरुवातील टिळक - आगकरांचा अभिनिवेश बाळगून असतात . व्यावसायिक पत्रकारितेच्या पाण्यात अजून उतरलेले नसल्यानं त्यांचं भावनिक रेघोट्या मारणं सुरु असतं . शिकवायला आलेल्या शिक्षकाला उलट सुलट प्रश्न विचारणं म्हणजे अनेकांना पराक्रम वाटतो . ठाकूर सर अशांना काही बोलून नाउमेद करायचे नाहीत , पण त्याचवेळी पत्रकारिता क्षेत्रातील वास्तवाची जाणीव करून देण्याचं काम ते सुरु करायचे . त्यासाठी ते स्वतः ला पत्रकारितेत सध्या जे सुरु आहे त्याबद्दल अपडेटेड  ठेवायचे . अध्यापनाच्या क्षेत्रात उतरल्यावर देखील सतत बदलत जाणाऱ्या फिल्ड सोबतचा कानेकट त्यांनी जाणीवपूर्वक जपला होता . पत्रकारितेचा कोर्स चालवणाऱ्या इतर अनेक संस्थांमधील शिक्षकांपेक्षा ठाकूर सरांचं हे वेगळेपण उठून दिसणारं .  

पत्रकारितेच्या परंपरागत शिक्षणाबरोबर नवं तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं हे पटवून द्यायचा त्यांचा प्रयत्न असायचा . याचाच भाग म्हणून रानडे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी टेक्निकल रायटिंग कोर्सची सुरुवात केली . अनेकांना त्यावेळी त्याच महत्व पटलं नाही . पण ज्यांनी ठाकूर सरांचं ऐकलं आणि तो कोर्स केला ते पुढे गेले . 
व्यवसायिक पत्रकारिता आणि त्याचवेळी समाज आणि लोकांबद्दलची बांधिलकी जपणं हे तसं कौशल्याचं काम . ठाकूर सरांनी तीस वर्षांच्या पत्रकारितेत ते कौशल्य कमावलं होतं . अध्यापनाच्या क्षेत्रात उतरल्यावर देखील तो पीळ त्यांनी कायम राखला .  
 
रानडे इन्स्टिट्यूट मध्ये देशातील अनेक नावाजलेल्या पत्रकारांना आमंत्रित केलं जायचं . मुंबई आणि कधी दिल्लीहून ते पत्रकार लेक्चर घेण्यासाठी यायचे . फक्त पत्रकारिता क्षेत्रातीलच नाही तर सामाजिक चळवळी आणि राजकीय  क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेकजण त्यावेळी लेक्चरर म्हणून बोलावले जायचे . विद्यार्थ्यांना त्या लेक्चरर म्हणून येणाऱ्या व्यक्तीला  हवा तो प्रश्न विचारता यायचा आणि लेक्चर देण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीलाही तिची मतं कितीही टोकाची असली तरी मोकळेपणाने मांडता यायची . आज याच अप्रूप वाटणं साहजिक आहे . रानडे इन्स्टिट्यूटचा  गाडा हाकणं तसं सोपं नव्हतं . अनेक वल्ली इथं होत्या . गेस्ट लेक्चरर म्हणून येणाऱ्या अनेकांच्या अनेक तऱ्हा होत्या. राजकारणही होतं . पण  ठाकूर सरांचा शांतपणा आणि संयम त्यावेळी वरचढ ठरला . रानडे इन्स्टिट्यूटची प्रत्येकावर्षीची ब्याच म्हणजे विविधतेचा गुच्छ असायचा. राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी निवडले जायचे. त्यामध्ये इतर राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची भर पडायची . एक दोन परदेशी विद्यार्थीही असायचे . साहजिकच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी सुरुवातीला कोमेजायचे . आजुबाजाचं वातावरण बघून भांबावून जायचे .  अशांना ठाकूर सरांची नजर अचूक हेरायची.  यु एन आय  , द  ऑब्झर्व्हर , इंडियन पोस्ट अशा माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि वर्गातही ते इंग्रजीतूनच शिकवायचे . पण मराठी भाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजरेत दुय्य्मपणाचा भाव कधीही जाणवला नाही . अगदी सहजपणे अशांशी ठाकूर सर बोलायचे .  त्यातून त्या विद्यार्थ्याला त्याच्याही नकळतपणे आत्मविश्वास मिळायचा . ठाकूर सरांच्या या हातोटीने अनेकांची गाडी पुढे सरकली.
  
ठाकूर सरांच्या बोलण्यात कधीही आमच्या काळात असं होतं आणि आता हे असं झालंय असं यायचं नाही . त्यामुळं त्यांना चिडलेलंही कुणी पाहिलं नाही . शिकवायला येणारे अनेकजण पत्रकारितेत होणारे बदल आवडत नसल्याने चिडचिड करायचे आणि आमच्याचवेळी कसं व्याकरण तपासलं जायचं आणि पत्रकारितेचं पावित्र्य जपलं जायचं हे सांगायचे . ठाकूर सरांनी हे असं भूतकाळात रमणं टाळलं . म्हणूनच अखेरपर्यंत ते सक्रिय पत्रकार राहिले . अनेक संस्थांसाठी काम करताना पत्रकार म्हणून त्यांचं लेखन त्यामुळेच सुरु राहिलं . पत्रकाराच्या एखाद्या बातमीबद्द आज सोशल मीडियावर टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात . काहीवेळा कौतूक होतं तर काहीवेळा शिव्यांची लाखोली वाहिली जाते . कौतुक करणाऱ्यांमध्ये जसे काही तोंडदेखलेपणा करणारे असतात तसं नावं ठेवणाऱ्यांमध्ये पूर्वग्रह बाळगणारेही असतात . या उलट - सुलट प्रतिक्रियांमुळे अनेकदा तो पत्रकार गोंधळतो . आपण राईट ट्रॅकवर आहोत का , की काहीतरी चुकलंय असं त्याला वाटायला लागतं . अशावेळी ठाकूर सरांचा फोन किंवा मेसेज आल्याचा अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना आलाय . त्यांच्या त्या फोन किंवा मेसेजनंतर शंका - कुशंकांचा धुरळा खाली बसायचा . चित्र शांत आणि स्पष्टपणे उंटायचं . ठाकूर सर असेच लक्षात राहतील . शांत आणि तरीही स्पष्ट ... 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
ABP Premium

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget