Rupali Chakankar Full PC : प्राजक्ता माळींबाबतचा अर्ज पोलिसांना पाठवला - रूपाली चाकणकर
Rupali Chakankar Full PC : प्राजक्ता माळींबाबतचा अर्ज पोलिसांना पाठवला - रूपाली चाकणकर
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ज्यांनी वाचा फोडली ते आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात पीडित देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरोपींच्या अटकेची मागणी करत आहेत. त्यानंतर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये मोर्चा काढला होता. त्यामध्येही धस यांनी त्यांच्यास्टाईलने भाषण करत बीडमधील दोन्ही मंत्र्यांवर हल्लाबोल केला. मात्र, दुसरीकडे यासंदर्भाने टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) नाव घेतल्याने वेगळाच वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांची तक्रारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता, सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळी व संतोष देशमुख प्रकरणावर पुन्हा भाष्य केलं आहे.