Gold Rate Today : एकीकडे रुपयाची घसरण सुरुच, दुसरीकडे सोन्याच्या दरात 350 रुपयांपर्यंत वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा दर किती?
Gold Rate Today : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आज देखील रुपयाच्या दरात घसरण झाली. लोकांनी याचवेळी आपला मोर्चा सोने खरेदीकडे वळवला.
Gold Silver Rate Today मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीच्या दराच्या परिणामामुळं भारतातील देशांतर्गत वायदेबाजारात सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. सोने आणि चांदीच्या दरात सकाळी 10 तेजी होती. मल्टी कमोडिटी एक्सेंजवर सोन्याच्या दरात 136 रुपयांची तेजी होती. 10 ग्रॅम सोन्याचे 76680 रुपयांवर व्यवहारसुरु होते. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे दर 76544 रुपये होते. आज, सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील 186 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. एक किलो चांदीचा दर 89073 रुपये होता. शुक्रवारी हा दर 88887 रुपयांवर होता.
सराफ बाजारात दागिने विक्रेत्यांकडून होणारे लिलाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं नवी दिल्लीत सोन्याच्या दरात 350 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.10 ग्रॅम सोन्याचे दर 79200 रुपये इतके होते रशिया यूक्रेन यांच्यातील युद्ध, पश्चिम आशियातील संघर्षाची स्थिती, जागतिक तणावर या कारणांमुळं लोकांकडून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधला जात आहे. गेल्या सत्रात 10 ग्रॅम सोन्याचे दर 78850 रुपये होते.
चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून सराफ बाजारात एक किलो चांदीचे दर 91700 रुपये किलो होते. या आठवड्यात चांदीच्या दरात 3550 रुपयांची वाढ झाली आहे. 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 350 रुपयांनी वाढून 78800 रुपयांवर पोहोचला आहे.
रुपयात घसरणीमुळं सोन्याच्या दरात वाढ
या क्षेत्रातील जाणकारांच्या मते रुपयाच्या दरात घसरण झाल्यानं लोकांकडून सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारला जात आहे. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाच्या दरात घसरण होत आहे. आजच्या आकडेवारीनुसार एका डॉलर्ससाठी भारताला 85.50 रुपये मोजावे लागतील. आज रुपयामध्ये 23 पैशांची घसरण झाली.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या मानव मोदी यांच्या मतानुसार ख्रिसमसच्या सुट्टीनंतर सोने दरात घसरण झाली होती. जानेवारीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार डोनाल्ड ट्रम्प स्वीकारतील. त्यानंतर अमेरिकेकडून धोरणात बदल केला जाईल, त्याचा देखील परिणाम जागतिक बाजारावर होऊ शकतो.
टीप : सोने आणि चांदीचे दर हे प्राथमिक माहितीवर आधारीत आहेत. प्रत्यक्ष बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बदल असू शकतो. सोने चांदीच्या दागिण्यांची विक्री करणाऱ्यांकडून त्यावर मेकिंग चार्जेस देखील आकारले जाऊ शकतात, त्यामुळं दर वेगवेगळे असू शकतात.
इतर बातम्या :