एक्स्प्लोर

Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल

Koregaon Bhima Shaurya Divas 2025: भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला शौर्यदिन आहे. शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

पुणे: कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला होऊ घातलेल्या शौर्यदिनानिमित्त पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी 1 जानेवारीला राज्यातील अनेक बांधव तुळापूर येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येत असतात.  यंदाही कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त सभेचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी वाहतुकीच्या मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. याठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

यावर्षी कोरेगाव भीमा सभेसाठी पाच हजार पोलीस कर्मचारी,सातशे पन्नास पोलिस आधिकारी  तैनात असणार आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करणार. याशिवाय, येथील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी 50 पोलिस टॉवर , 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस रथक असेल अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मिडीयावर निर्बंध असणार असतील. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

पार्किंगसाठी सोय 

कोणालाही अडचण होणार नाही यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्यात 45 पार्किंग सेंटर आहेत. 30 हजार चारचाकी आणि ३० दुचाकी क्षमता असलेले सेंटर आहेत.

वाहतूक मार्गात कोणते बदल होणार? 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त सभेचे नियोजन करण्यात आले असून वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.  तरी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. 

बदललेले मार्ग 

* नगर रस्त्यावरील वाहतूक बदल एक जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार

* पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याने जावे लागेल. 

* सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. 

* मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जावे. 

* मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या  लहान वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे अहिल्यानगरकडे जावे.

* कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव, चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. 

* इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहनांस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुयायींच्या लहान वाहनांनाच  प्रवेशासाठी परवानगी  देण्यात येईल. 

* विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येईल.

पुण्यात 31 डिसेंबरला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 31 डिसेंबरला गर्दीच्या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्यात येईल. शहरात ड्रंक एंड ड्राइव्ह विरोधात मोहीम राबवण्यात येणार आहे. अधिकृत ठिकाणांना परवानगी देण्यात आली आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत दारू दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.  ड्रग्ज आणि अल्पवयीनांना दारु न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सगळ्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येईल. 31 डिसेंबर 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. तर 700 वाहतूक पोलीसही कार्यरत असतील.  cctv कॅमेराचा लाइव मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात असणार  आहेत. एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते त्याठिकाणी नजर ठेवण्यात येणार. ४० ठिकाणी अधिकृत पार्ट्या आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
Yashasvi Jaiswal Wicket Controversy : OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीतPune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामाPrajakta Mali :  राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार प्राप्तTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
Yashasvi Jaiswal Wicket Controversy : OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
Prajakta Mali and Suresh Dhas: प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया
प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाकडून कारवाईचं पहिलं पाऊल
Embed widget