एक्स्प्लोर
Advertisement

Photos: हार्दिक पांड्या कुटुंबासोबत घेतोय सुट्टीचा आनंद; पत्नी नताशाने शेअर केले सुंदर फोटो
Hardik Pandya Photos: हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने नुकतेच फॅमिली पिकनिकचे सुंदर फोटो सोशल मीडियावर काही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या देखील दिसत आहे.

Hardik Pandya Family Vacation
1/7

टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या सध्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. आयपीएल 2023 पासून तो अनेक ठिकाणी फिरायला गेला आहे. पांड्याने देखील सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. तो सध्या कुटुंबाला वेळ देत आहे.
2/7

नताशाने देखील नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. नताशाने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती तिच्या मुलासोबत पाण्यात पाय टाकून बसलेली दिसत आहे.
3/7

समुद्राला लागून असलेल्या रिसॉर्टमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा आपल्या मुलासोबत फिरायला गेले आहेत. त्यांच्या सुंदर क्षणांचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
4/7

हार्दिकने मुलगा आणि पत्नीसोबत चांगला वेळ घालवला. याआधीही ते सहकुटुंब अनेक ठिकाणी फिरायला गेले होते.
5/7

हार्दिक आपल्या मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. हार्दिक आणि नताशाच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
6/7

नताशाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टला 5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हार्दिकनेही हार्ट इमोजीची कमेंट केली आहे.
7/7

नताशाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. तिला 3.7 दशलक्ष लोक फॉलो करतात. तर ती 297 लोकांना फॉलो करते.
Published at : 24 Jun 2023 07:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
