Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Dinga Dinga Disease VIDEO : डिंगा डिंगा हा नवा आजार नेमका आहे तरी काय?
Dinga Dinga Disease VIDEO : सध्याच्या काळात जगभरात अनेक आजार तोंड वर काढताना दिसत आहेत. कोरोना महामारीनंतर (Corona) जागतिक आरोग्य संघटनेने सातत्याने संपूर्ण जगाला दुसऱ्या महामारीबाबत सावधान करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनानंतर आणखी नवा आजार महामारीचे कारण बनू शकतो, असंही म्हटलं गेलं होतं.. दरम्यान, या नव्या आजाराबाबत कोणतीही माहिती नसल्याने शास्त्रज्ञांनी या आजाराला 'X' असं नाव दिलं आहे. गेल्या काही दिवसात आफ्रिकेत या आजाराची अनेकांना लागण झाली आहे.
दरम्यान, युगांडामध्ये देखील एका आजाराने थैमान घातलंय. युगांडामध्ये अनेकांना हा आजार झाला असून याला 'डिंगा-डिंगा'(Dinga Dinga Disease symptoms) असे नाव देण्यात आले आहे. या आजाराला हे नाव त्याच्या प्रमुख लक्षणांमुळे देण्यात आल्याची चर्चा आहे. "डिंगा डिंगा" (What is Dinga Dinga Disease) चा अर्थ हालत हालत डान्स करणे असा होतो. हा आजार झाल्यानंतर संबंधित रुग्ण हालत-डुलत राहात असल्याचे चित्र आहे.
डिंगा डिंगा हा आजार आहे तरी काय?
युगांडामध्ये थैमान घातलेला डिंगा डिंगा हा आजाराची लागण खासकरुन महिला आणि मुलींना झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, या आजार होण्यामागे नेमकं काय कारण आहे. याबाबत डॉक्टरांना अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. डिंगा डिंगा आजारामुळे शरिरात अनियंत्रित कंपन होतात आणि चालताना अडचणी येतात.
“Mbu”
— TRAVEL SPECIALIST🇺🇬 (@Uganda_Expozed) November 14, 2024
New sickness storms schools
It's not a dance but an undiagnosed illness called dinga dinga.
Some cases were recently reported in Bundibuyo pic.twitter.com/mjMU3wiDIM
डिंगा डिंगा आजाराची लक्षणं कोणती?
सध्या या आजाराबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे डिंगाडिंगा या आजाराची प्रमुख लक्षण कोणती आहेत. याबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही. मात्र, या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये अनेक लक्षण आढळतात. यामध्ये रुग्णाचे शरीर सातत्याने आणि जास्त प्रमाणात हालू लागते. एखादा माणूस डान्स करतो, त्याप्रमाणे शरिराची हालचाल होऊ लागते. ताप येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा अर्धांगवायु झाल्याप्रमाणे शरिराची अवस्था होणे, ही या आजारीची लक्षण असल्याचे बोलले जाते. स्थानिक माध्यमांच्या मते, या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना चालणे जवळजवळ अशक्य होते, कारण त्यांचे शरीर अनियंत्रितपणे थरथरू लागते.
लक्षणे जाणवू लागल्यास काय करावे?
सध्या या आजाराचे नेमके कारण कळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा सुरुवातीला काही लक्षणे दिसतात, तेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यामुळे ताप येणे, अंगाचा थरकाप उडणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणेही अत्यंत गरजेचे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )