Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) आज बुधवारी उत्तर कर्नाटकावर चर्चा झाली. यावेळी अथणी येथील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे, असे वक्तव्य केले. आता लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काँग्रेस (Congress) आमदारावर निशाणा साधलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की, काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केल्यास ते सहन केले जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला हवे. त्या आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. जे राज्यातील काँग्रेसच्या आमदारांचे म्हणणं आहे तेच आमचे म्हणणे आहे. रक्त सांडून आम्ही मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे त्यांनी म्हटले. तर बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर करावं की, बेळगाव केंद्रशासित व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.