एक्स्प्लोर
छावामध्ये औरंगजेबच नव्हे तर त्याची मुलगीही दिसणार, सुंदर 'शेहजादी'ची भूमिका साकारणारी 'ती' अभिनेत्री आहे तरी कोण?
Chhaava Film : छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बादशाहा औरंगजेबाची मुलगी दाखवली जाणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तशी एक झलक दाखवण्यात आली आहे.

chhaava film aurangzeb daughter Shehzadi Zinat-un-Nissa
1/7

संपूर्ण देशभरात चर्चा असलेला छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे प्रमुख भूमिकेत आहेत.
2/7

छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला आहे. विकी कौशल याने संभाजी महाराज यांचे पात्र साकारलेले आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत दिसेल.
3/7

विशेष म्हणजे या चित्रपटात कसलेला अभिनेता अक्षय खन्ना हा औरंगजेब बादशाहाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
4/7

दरम्यान, याच चित्रपटात औरंगजेब बादशाहाची मुलगी शेहजादी झिनत ऊन निस्सा हीदेखील दिसणार आहे.
5/7

राजकुमारी झिनतची भूमिका डायना पेंटी ही साकारणार आहे. छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डायना पेंटीची एक झलक आपल्याला पाहायला मिळते.
6/7

तिने नुकतेच छावा चित्रपटातील भूमिकेचा एक फोटो शोशल मीडियावर शेअर केला आहे.
7/7

ट्रेलरमधील तिचा अभिनय आणि तिने शेअर केलेल्या फोटोमुळे डायनाची नेमकी भूमिका काय असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
Published at : 13 Feb 2025 06:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
