एक्स्प्लोर
PHOTO | रेड गाऊनमध्ये Janhvi Kapoorचा क्लासी अंदाज

Janhavi_Kapoor
1/7

आगामी चित्रपट रूहीमध्ये भूताची भूमिका साकारणाऱ्या जान्हवीने आपल्या लूक्सनी सर्वांची झोप उडवली आहे. दरम्यान, जान्हवीने रूही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ग्लॅमरस लूक कॅरी केला होता. जान्हवीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. जान्हवीने आपल्या रेड गाऊनमधील बोल्ड लूक शेअर केला आहे. चाहत्यांना जान्हवीचा लूक प्रचंड आवडला आहे.
2/7

जान्हवीने आपला आगामी चित्रपट रूहीच्या प्रमोशनसाठी एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती रेड ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या ड्रेसमध्ये जान्हवीचा हॉट आणि बोल्ड लूक घायाळ करणारा आहे.
3/7

या फोटोंमध्ये जान्हवीने स्लिट आणि स्वीटहार्ट नेकलाइन असणारा एक रेड गाऊन वेअर केला आहे. या गाऊनसोबत जान्हवीने रेड हॉट लिपस्टिक लावली आहे. त्यामुळे जान्हवीचा लूक आणखी खुलण्यास मदत होत आहे.
4/7

जान्हवीच्या क्लासी लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते जान्हवीच्या बोल्ड आणि सेक्सी अंदाजावर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
5/7

जान्हवीने आपल्या या क्लासी अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. आतापर्यंत या फोटोला लाखो लाईक्स आले आहेत. प्रत्येकजण जान्हवीच्या अदांवर फिदा झालं आहे.
6/7

याव्यतिरिक्त जान्हवी काही फोटोंमध्ये क्रॉप टॉप आणि पिंक पँटमध्ये दिसून आली. जान्हवीचा हा लूकही चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
7/7

दरम्यान, चित्रपट रूहीनंतर आता जान्हवी चित्रपट गुड लक जेरीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याव्यतिरिक्त जान्हवी लवकरच दोस्तान 2 मध्येही दिसून येणार आहे. यामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
Published at : 16 Mar 2021 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
