एक्स्प्लोर
Red chilli : नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी
नंदुरबार बाजार समितीत दोन लाख क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढच्या महिन्यात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Nandurbar chillii
1/10

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ (chilli Market) म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Market Committee) ओळख आहे
2/10

नंदुरबार बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी सुरु आहे. यावर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची (Red chilli) खरेदी करण्यात आली आहे.
3/10

मार्च महिन्यात नंदुरबार बाजार समितीत 25 हजार क्विंटल मिरचीची आवक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
4/10

मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी केली जात आहे.
5/10

बदलत्या हवामानाचा मोठा फटका मिरची पिकाला बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काही प्रमाणावर मिरचीच्या उत्पन्नात घटही झाली आहे.
6/10

वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे
7/10

सध्या ओल्या लाल मिरचीला तीन हजार रुपयापासून ते 5 हजार 500 रुपयापर्यंतचा दर दिला जात आहे.
8/10

कोरड्या लाल मिरचीला आठ हजार ते 15 हजार रुपयांचा दर मिळत आहे. मिरचीचा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला आहे
9/10

यावर्षी मिरचीचे उत्पन्न चांगलं झालं होतं. त्यामुळं पुढील हंगामात देखील मिरचीची लागवड चांगल्या प्रमाणावर होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे.
10/10

नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी केली जात आहे. आत्तापर्यंत मिरची खरेदीचा दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.
Published at : 25 Feb 2023 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
