एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HIV एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय सापडण्याची चिन्हं
निळ्या रंगाची लांबट आकाराची ट्रुवाडा गोळी संशोधनात सहभागी झालेल्या गे आणि बायसेक्शुअल पुरुषांना दररोज दिली जात होती.
मुंबई : ऑस्ट्रेलियातील हजारो पुरुषांनी निळ्या रंगाच्या अँटीव्हायरल गोळीचं दररोज सेवन केल्यामुळे एचआयव्हीच्या नवीन केसेसमध्ये अभूतपूर्व घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एड्ससारख्या दुर्धर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय सापडण्याची चिन्हं आहेत.
एचआयव्हीचं नव्याने निदान झालेल्या गे आणि बायसेक्शुअल पुरुषांच्या संख्येत जवळपास एक तृतीयांशाने घट दिसून आली. एड्सला कारणीभूत ठरणारे विषाणू कमी करण्यासाठी ट्रुवाडा गोळीचा कसा परिणाम होतो, याविषयी अभ्यास करणाऱ्या जगातील पहिल्या संशोधनात ही विक्रमी घट पाहायला मिळाली.
निळ्या रंगाची लांबट आकाराची ट्रुवाडा गोळी संशोधनात सहभागी झालेल्या गे आणि बायसेक्शुअल पुरुषांना दररोज दिली जात होती.
प्री-एक्स्पोजर प्रोफायलॅक्सिस ही उपचारपद्धती वापरुन एड्सला कारक असणारे विषाणू रोखता येऊ शकतात. 'लँसेट एचआयव्ही' या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. या संशोधनामुळे इतर देशांनाही एचआयव्हीबाबत अधिक अभ्यासासाठी मदत होऊ शकते.
2030 पर्यंत एड्सचा समूळ नायनाट करण्याचं संयुक्त महासंघांचं उद्दिष्ट आहे. जगभरात 1990 पासून दरवर्षी 30 लाखापेक्षा जास्त व्यक्तींना एचआयव्हीची बाधा होत असल्याची नोंद आहे. मात्र 2017 मध्ये ही आकडेवारी 18 लाखांवर आल्याचं संशोधनात म्हटलं आहे. अर्थात हेटरोसेक्शुअल व्यक्तींबाबत हे अनुमान सरसकट लावता येणार नाहीत, असाही उल्लेख आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement